Supriya Sule News: अजितदादांबद्दल सुप्रियाताईंचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या, ही माझी चूक झाली का?

Maharashtra lok sabha election 2024: अजित पवार हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते मोठे नेते आहेत, मोठ्यांचा आधार करणे ही आमची शिकवण आहे.
Ajit Pawar Supriya Sule
Ajit Pawar Supriya Sule Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मोठ्या भावाचा किंवा मोठ्या नेत्याचा मानसन्मान ठेवण्याचे संस्कार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि माझ्या आईचे माझ्यावर आहेत. त्यामुळे गेली 15 वर्षे बारामती लोकसभा मतदारसंघात काम करताना अजितदादांना (Ajit Pawar)मान दिला. शरद पवार यांनी अजितदादांवर बारामतीची जबाबदारी दिली होती, मग त्यांना विचारले तर बिघडले कुठे? अशी विचारणा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी केली.

बारामती लोकसभेची निवडणूक (Sule Baramati Lok Sabha 2024) दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. दररोज नवीन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुनेत्रा पवार उपस्थिती लावत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून महत्त्वाच्या नेत्यांना बरोबर घेत राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला अजित पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर सत्तेत सहभागी झालेल्या अजितदादांनी बारामती लोकसभेला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही दिवसांपासून जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लोकसभेला माझ्या विचाराच्या उमेदवाराला विजयी करा, अशी साद घातली आहे. संसदरत्न पुरस्कार आणि सेल्फी काढून मतदारसंघात विकासासाठी निधी मिळाला नाही, मी प्रयत्न केले म्हणून निधी मिळाला, असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावर टीकादेखील केली आहे.

Ajit Pawar Supriya Sule
Beed Lok Sabha 2024: बीडसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोकच्या तयारीत?; तगडा चेहरा उतरविणार रिंगणात

अजितदादांनी माझ्या विचाराच्या उमेदवाराला विजयी करा, या केलेल्या आवाहनाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, गेली पंधरा वर्षे मग बारामतीमध्ये कोणाच्या विचारांचा खासदार होता. प्रत्येक गोष्टीसाठी अजितदादांकडे यापूर्वी सल्ला मागितला जात होता.

याबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या, ते आमचे संस्कार आहेत. पवारसाहेबांनी अजितदादांवर बारामतीची जबाबदारी टाकली होती. अजित पवार हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते मोठे नेते आहेत, मोठ्यांचा आधार करणे ही आमची शिकवण आहे. त्यामुळे यापूर्वी कोणीही माझ्याकडे प्रश्न घेऊन आले की, आपण अजितदादांना विचारू त्यांचा सल्ला घेऊ प्रश्न सोडवू असे म्हणत होते. ते वरिष्ठ आहेत, त्यांचा सन्मान ठेवला ही माझी चूक झाली का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com