Jaydatta Kshirsagar Vs Sandeep Kshirsagar : बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्याचं 'पॅचअप'?

Jaydutta Kshirsagar News : जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये रविवारी सकाळी 11 वाजता मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
Jaydatta Kshirsagar |Sandeep Kshirsagar
Jaydatta Kshirsagar |Sandeep Kshirsagarsarkarnama

Beed News, 12 June : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) नेते बजरंग सोनवणे ( bajrang Sonwane ) यांनी भाजपच्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांचा पराभव केला. या निकालानंतर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय नेते भूमिका घेताना दिसत आहेत.

यातच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चां रंगली आहे. जयदत्त क्षीरसागर ( Jaydatta Kshirsagar ) बीडमध्ये रविवारी सकाळी 11 वाजता मेळावा घेणार आहेत.

खासदार बजरंग सोनवणे यांनी क्षीरसागरांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेत सत्कार केला. त्यासह पक्षश्रेष्ठीसोबत बंद दाराआड बैठका झाल्या आहेत. यामुळे ते राष्ट्रवादीच्या ( शरदचंद्र पवार ) मार्गावर असल्याचं सांगितल जात आहे. त्यांनी 'तुतारी' हाती घेतल्यास आमदार संदीप क्षीरसागर ( sandeep Kshirsagar ) आणि जयदत्त क्षीरसागर काका-पुतणे एकत्र येणार आहेत.

पुतण्याची एन्ट्री अन् जयदत्त क्षीरसागर NCP तून बाहेर..

आमदार आणि मंत्री राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर आपला राजकीय कार्यकाळातील सर्वाधिक काळ शरद पवार यांच्यासोबत राहिलेले आहेत. पण, त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राजकारणात एन्ट्री केली. त्यानंतर राष्ट्रवादीनं जयदत्त क्षीरसागर यांना बाजूला करत संदीप क्षीरसागर यांना बळ दिलं. यामुळे नाराज झालेल्या क्षीरसागर यांनी राष्ट्रवादील सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा 'धनुष्यबाण' हाती घेतला.

Jaydatta Kshirsagar |Sandeep Kshirsagar
Bajrang Sonawane: वडील मारतील, बायको नाश्ता देणार नाही, असे बीडचे 'बाप्पा'का म्हणाले...

उद्धव ठाकरेंनी क्षीरसागर यांना मंत्रिपदही दिलं. पण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. यानंतरही क्षीरसागर शिवसेनेत सक्रिय होते. पण, काही कार्यक्रमांना प्रोटोकॉलप्रमाणे उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांचे फोटो वापरले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची जवळीकता वाढली. त्यामुळे शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

दोन वर्षे झालं जयदत्त क्षीरसागर कोणत्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हते. आता लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि बीडमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळालं आहे. त्यामुळे क्षीरसागर पुन्हा शरद पवारांच्या पक्षाशी जवळीकता साधत आहेत.

Jaydatta Kshirsagar |Sandeep Kshirsagar
Bajrang Sonwane : राष्ट्रवादीला लोकसभेत दुसऱ्यांदा गुलाल लागण्याला क्षीरसागरच ठरले 'कारण'

बीडमधून संदीप क्षीरसागर आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली, तर पुतण्याचं काय? आणि संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी दिली तर काकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होणार आहे. काका-पुतणे एकत्र येणार असतील, तर दोघांनाही त्याच तोडीची पदे देण्याचं आव्हान राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com