

Marathwada News: माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांची गेल्या ४० वर्षांपासून सत्ता असलेल्या बीड बाजार समिती निवडणुकीत आता वेगवान घडामोडींना वेग आला आहे. क्षीरसागरांना रोखायचे असेल तर तीन ऐवजी दोनच पॅनल उभे करून थेट लढत देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप-शिवसंग्राम आदी पक्षांनी घेतला होता. परंतु तो प्रत्यक्षात अंमलात येण्याची शक्यता कमीच दिसते.
असे झाले आणि तीन पॅनल मैदानात राहिले तर मात्र याचा फायदा क्षीरसागरांना आपली सत्ता कायम राखण्यात होणार आहे. (Beed) राष्ट्रवादीचे आमदार व क्षीरसागरांचे पुतणे संदीप यांनी काकांविरुद्ध दंड थोपटले असले तरी त्यांना इतर पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. (Marathwada) ती मिळाली तरच काकांना रोखणे शक्य होणार आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी आपले राजकीय कसब वापरत थेट भाजपच्या गोटातच सुरुंग लावण्याचे काम आमदार लक्ष्मण पवार यांना सोबत घेत केले आहे. आमदार सुरेश धस, नंदकिशोर मुंदडा हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा बॅनरवर त्यांचे फोटो लावत क्षीरसागरांनी केला आहे. अर्थात या दोघांनी आपल्या त्यांच्या पॅनलशी काही संबंध नसल्याचे सांगत हात झटकले आहेत, मात्र प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत पडद्यामागे काय वाटाघाडी घडतात यावर सगळे काही अवलंबून असणार आहे.
भाजपचे आधे इधर आधे उधर असे चित्र असल्याने सध्या तरी आघाडीसोबत जाण्याचा त्याचा इरादा दिसत नाही. एकच पॅनल देणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतरही महाविकास आघाडी आणि महायुती यांचे दोन स्वतंत्र पॅनल लढत आहेत. त्यामुळे दुरंगी लढतीची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
त्यानंतर आमदार धस, नंदकिशोर मुंदडा हे काय भूमिका घेतात, शिवसंग्राम आपल्या भूमिकेवर ठाम राहते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुर्तास लक्ष्मण पवार यांची क्षीरसागरांसोबत जाण्याची भूमिका ठाम आहे. बाजार समितीच्या निवडणुका या पक्ष पातळीवर नसतात, त्यामुळे आपल्याला पक्षाकडून कुठलीही विचारणा झालेली नाही किंवा आपल्यावर बंधन देखील नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. आमदार पवारांच्या या ठाम भूमिकेमुळे जयदत्त क्षीरसागर यांची लढाई अधिक सोपी होणार आहे. (Political Breaking News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.