NCP Politics : आरोपांनी घेरलेल्या मंत्री मुंडेंना 'प्रमोशन', तर भुजबळांची 'RSS'शी जवळीक; अजितदादांच्या पक्षातल्या राजकारणावर नेते अस्वस्थ?

Beed Minister Dhananjay Munde Ajit Pawar NCP party Nashik Chhagan Bhujbal RSS BJP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री धनंजय मुंडेंचं प्रमोशन मिळालं असतानाच, छगन भुजबळ मात्र नाराज आहेत.
Chhagan Bhujbal Dhananjay Munde
Chhagan Bhujbal Dhananjay Munde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं कोणत्या दिशेने राजकारण सुरू आहे, हे पक्ष संघटनेतील नेते, कार्यकर्ते अन् पदाधिकारी यांना समजण्यापलीकडे गेले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पक्षात प्रमोशन मिळाले असले, तरी त्यांनी पक्ष संघटनेकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून घेरलेले मंत्री धनंजय मुंडे यांनाही प्रमोशन देऊन नेमकं काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न पक्ष संघटनेतील नेते एकमेकांना खासगीत विचारात आहेत. या दोन्ही दिग्गज नेत्यांना पक्षात प्रमोशन मिळाले असतानाच, भुजबळांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी वाढवलेल्या जवळीमुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे संस्थापक सदस्य छगन भुजबळ पक्षातील नाराजी सर्वश्रुत आहे. अजितदादांनी मध्यंतरी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून, मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळात डावलल्यापासून भुजबळ अन् अजितदादांची भेट शिर्डीतील नवसंकल्प शिबिराचा कार्यक्रम वगळता, अजून तरी समोर आलेली नाही. याच काळात भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या आहेत.

Chhagan Bhujbal Dhananjay Munde
Suresh Dhas : मंत्री मुंडेंच्या भेटीनंतर आमदार धसांना खुलासा करता-करता नाकीनऊ, दोनदा पत्रकार परिषद घेण्याची वेळ; म्हणाले, 'मनोजदादा आमचं दैवत'

ओबीसींसाठी (OBC) राष्ट्रीय पातळीवर काम करणार असून, राज्यासह राष्ट्रीय दौरा काढणार असल्याची घोषणा केली होती. याच काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जवळीक वाढवली आहे. समता परिषदेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भुजबळ कधी, केव्हा, कोणता निर्णय घेतली याचा नेम नाही. तशी पक्षातील नेत्यांना देखील धास्ती आहे.

Chhagan Bhujbal Dhananjay Munde
Modi Government News : मोदी सरकारची शिवजयंतीनिमित्त मोठी घोषणा; राज्य सरकारला धाडलं पत्र

यातच छगन भुजबळांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बड्या नेत्याचे जाहीर कौतुक केले. हे कौतुकाने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. निफाड तालुक्यातील श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यात एकत्र आलेले संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी अन् छगन भुजबळ यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. छगन भुजबळ यांनी भैय्याजी या ठिकाणी आल्यामुळे आपणही आलो. जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिथे त्यांचे नाव आहे, असे म्हणत भगवान श्रीराम मूर्तीची पूजा केली.

भुजबळांबाबत अजितदादा सावध

अजितदादा देखील भुजबळांच्या भूमिकेवर सावध आहे. असे असले, तरी अजितदादांनी त्यांचाही कोअर कमिटीत समावेश करत पक्ष संघटनेची जबाबदारी दिली आहे. पक्षाकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली असताना, भुजबळ पक्षाच्या संघटनेची जबाबदारी कितपत संभाळतील, यावरून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊ लागल्या आहेत.

कराडमुळे मुंडेंभोवती अडचणी कायम

याच दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचे पक्षात प्रमोशन मिळालं आहे. पक्षाच्या कोअर कमिटीत त्यांना स्थान मिळालं आहे. बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत आहे. मंत्री मुंडे यातूनच अडचणीत आले आहेत.

मंत्री मुंडेंना आरोपांनी घेरलं?

संतोष देशमुख प्रकरण तापलेले असतानाच, मंत्री मुंडेंवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी विभागात झालेल्या घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील मंत्री मुंडेंविरोधात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे आरोपांनी राळ उडवून दिली आहे.

मंत्री मुंडे पक्ष किती वेळ देणार?

मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी पक्षातून आणि विरोधकांकडून दबाव वाढत असताना, त्यांना पक्षात प्रमोशन देण्यात आले आहे. अशा परिस्थिती मंत्री मुंडे पक्ष वाढीस आणि संघटनेत किती वेळ देणार, यावरून पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com