
Mumbai News : मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर विरोधकांकडून टीकेचे धनी ठरले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत, आमदार धस यांच्यावर जहरी टीका केली. भाजप सुरेश धस यांना ही भेट चांगली भोवली असून, त्यावर खुलासा करता-करताना तोंडाला फेस आला आहे.
विशेष करून मनोज जरांगे यांची टीकेवर काय बोलू अन् कशी भूमिका मांडू, असे झाले आहे. सुरेश धस यांनी, 'मी मुंडे यांची भेट घेतली असली, तरी संतोष देशमुख प्रकरणात मी लढत राहणार आहे. मनोजदादा आमचं दैवत आहे, गडबडीत काहीतरी बोलले असतील. मी त्यांच्याशी बोलेन', असे म्हटले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी आयोजित केलेल्या जेवणाच्या कार्यक्रमाला भाजप आमदार सुरेश धस गेले होते. तिथे मंत्री धनंजय मुंडे आले तिथं त्यांच्यात साडेचार तास बैठक झाली, चर्चा झाली, असे समोर आले आहे. या भेटीची माहिती समोर येताच, भाजप आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केल्या जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांच्यावर कडक शब्दात प्रहार केले आहेत.
सुरेश धस यांनी या भेटीवर खुलासा करताना दोनदा पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेवणासाठी बोलावले होते. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अचानक तिथे आले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, त्यांच्याकडून काही सांगण्यात चूक झाली असेल. परंतु त्यांनी आम्हाला हे मिटतंय का? अशा प्रकारचं वाक्य वापरलं. मी क्लिअरकट त्यावेळीच सांगितले आहे की, मनभेद नाहीत, मतभेद आहेत. आता माघार नाही. ही सर्व बाब पंधरा-वीस दिवसांपूर्वीची आहे".
'हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या व्यक्तीला भेटायला जाण्याची आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणए मी त्यांना भेटलो. परवा देखील भेटलो. हे करताना, 73 कोटींच्या बोगस घोटाळ्याचे पत्र मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवले आहे. कृषी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. घोटाळ्याची कागदपत्र गोळा करत आहे. धनंजय देशमुख यांच्याशीही यावर बोललो आहे. मी मुंडे यांची भेट घेतली असली, तरी संतोष देशमुख प्रकरणातील लढा कायम राहणार आहे. मनोजदादा आमचं दैवत आहे, गडबडीत काहीतरी बोलले असतील. मी त्यांच्याशी बोलेन', असेही सुरेश धस यांनी म्हटले.
'मयत संतोष देशमुख यांच्या पत्नींना नोकरीला लावते म्हणून प्रलोभने येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी कोण आमिष दाखवत आहे, याची देखील माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री यांनी सरकारी नोकरी दिली, तरच आम्ही विचार करू', असेही सुरेश धस यांनी म्हटले.
सुरेश धस यांच्या या भेटीनंतर मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तातडीने मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर मराठ्यांनी विश्वास टाकला होता. तुम्ही त्यांच्याशी गद्दारी केली. गद्दारांच्या यादीत जाऊन बसलात, हे फार दुःखदायक आहे. देशमुख कुटुंबीयांचे रक्त सुरेश धस शोषण करतील. मराठ्याच्या तोंडात माती टाकतील आणि त्यांच्या अन्नात घाण करील, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.