Beed tax officer found dead : GST खात्यात खळबळ! कारमध्ये अधिकारी मृत, सुसाईड नोटने उघड केली धक्कादायक कहाणी; वरिष्ठ ताब्यात

Beed Missing Tax Officer Sachin Jadhavar Found Dead on Highway : बीडमधील बेपत्ता राज्य कर अधिकारी सचिन जाधवर कारमध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Sachin Jadhavar
Sachin JadhavarSarkarnama
Published on
Updated on

Beed crime news : बीडमधील राज्य कर अधिकारी सचिन जाधवर (वय 45) कारमध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सचिन जाधवर हे कालपासून बेपत्ता होते. सचिन जाधवर यांची कार सोलापूर-धुळे महामार्गालगत आढळली.

या कारमध्ये ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांना सचिन जाधवर यांची सुसाईट नोट सापडली असून, यात त्यांच्या वरिष्ठांविषयी अनेक धक्कादायक खुलासे आहेत. यानंतर बीड पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, सचिन जाधवर यांच्या वरिष्ठांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

सचिन जाधवर शुक्रवारी कार्यालयात गेले, तेव्हापासून ते बेपत्ता होते. त्यांची पत्नी याबाबत बीड (BEED) जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर घरांच्या त्यांच्या नातेवाइकांकडे देखील शोध घेतला. पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कपिलधार कमानीजवळील बायपास रोडवर, पाली परिसरात बराच वेळेपासून कार उभी असल्याची माहिती स्थानिकांच्या लक्षात आली.

बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी सचिन जाधवर यांच्या कारची सखोल तपासणी केली. या तपासणीत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत सचिन जाधवर यांनी मृत्यूला कारणांची माहिती दिली. जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे, यांच्या मानसिक छळाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख, या सुसाईड नोटमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

Sachin Jadhavar
NOTA votes : मतदान पेटलं, पण विश्वास हरपला; नगरसेवक निवडणुकीत 18 हजार 'नोटा' मतांनी राजकीय पक्ष हादरले

दिलीप फाटे पोलिसांच्या ताब्यात

वरिष्ठांकडून होणारा सततचा मानसिक त्रास सहन न झाल्याने त्यांनी जीवन संपवले, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत असल्याने जीसएटी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बीड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, तातडीने कारवाई सुरू केली असून, चौकशीसाठी सचिन जाधवर यांच्या वरिष्ठांना ताब्यात घेतलं आहे. बीडचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी, सुसाईड नोटमध्ये नाव असलेले अधिकारी दिलीप फाटे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली.

Sachin Jadhavar
University teachers recruitment : ‘आता सबब नको!’ सर्वोच्च न्यायालयाचा चार महिन्यांचा अल्टीमेटम; विद्यापीठांतील रिक्त पदे तातडीने भरा

सुसाईड नोटवरून गुन्ह्याची नोंद

सचिन जाधवर यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालय इथं उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी सचिन जाधवर यांच्या सुसाईड नोटच्या संदर्भावरून गुन्ह्याची नोंद घेतली आहे. जीएसटी विभागातील अंतर्गत वादातून हा प्रकार घडला का? याचीही चौकशी केली जात आहे.

बीडसह राज्यात मोठी खळबळ

सचिन जाधवर आणि संबंधित अधिकारी यांच्यातील मागील काही दिवसांतील संवाद, कामकाज आणि व्यवहारांची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे. एका जबाबदार सरकारी अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या त्रासामुळे जीव गमवावा लागल्याने बीडसह राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com