

Ahilyanagar municipal election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सुमारे 2 लाख मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. पण यात 18 हजारावर मतदारांनी रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी कोणीही आपल्या पसंतीचे नाही, असा संदेश 'नोटा' (यापैकी कोणीही नाही) चिन्ह दाबून दिला.
तीन प्रभागात विजयी व पराभूत उमेदवारांच्या फरकापेक्षा जास्त मते नोटाला मिळाली आहेत. तर बहुतांश प्रभागात मत विभागणीच निर्णायक ठरली असून, सर्वच राजकीय पक्षांना ही आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Municipal Election) 18 हजार 513 मतदारांची 'नोटा'ला पसंती दिली व पोस्टलची तब्बल 478 मते अवैध झाली. 'नोटा'ला पसंती देणारांना उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकही योग्य वाटला नाही. त्यामुळे त्यांनी 'नोटा'चे बटण दाबले आहे.
17 प्रभागातील 63 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 3 लाख 7 हजार 9 मतदारांपैकी 1 लाख 97 हजार 555 मतदारांनी (Voter) मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 18 हजार 513 मतदारांनी 'नोटा' बटण दाबले आहे. सर्वाधिक प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 हजार 285 मते 'नोटा'ला पडली आहेत. तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक 4 मध्ये 438 मते 'नोटा'ला आहेत.
प्रभाग क्रमांक 1 - 1 हजार 973, प्रभाग क्रमांक 2 - 2 हजार 285, प्रभाग क्रमांक 3 - 905, प्रभाग्र क्रमांक 4 - 438, प्रभाग क्रमांक 5 - 1 हजार 26, प्रभाग क्रमांक 6 - 556, प्रभाग क्रमांक 7 -910, प्रभाग क्रमांक 8 -813, प्रभाग क्रमांक 9 - 1 हजार 300, प्रभाग क्रमांक 10 - 997, प्रभाग क्रमांक 11 - 1 हजार 354, प्रभाग क्रमांक 12 - 800, प्रभाग क्रमांक 13 - 1 हजार 548, प्रभाग क्रमांक 14 - 907, प्रभाग क्रमांक 15 -984, प्रभाग क्रमांक 16 -923, प्रभाग क्रमांक 17 -794.
या निवडणुकीत 478 पोस्टल मते अवैध ठरली. त्यात सर्वाधिक प्रभाग क्रमांक 1 मध्ये 160 मते आहे. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक 2 मध्ये 130 मते अवैध ठरली. प्रभाग क्रमांक 5, 8, 13 या तीन प्रभागामध्ये एकही मत अवैध ठरले नाही.
17 प्रभागांपैकी तीन प्रभागात 'नोटा'ला पडलेली मते विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतांच्या फरकापेक्षा जास्त आहेत. प्रभाग चार सर्वसाधारण जागेवर काँग्रेसचे शम्स खान यांना 6293 मते आहेत, तर पराभूत 'AIMIM'चे समद खान यांना 6158 मते आहेत. या दोघांतील फरक 135 मतांचा आहे तर या प्रभागात 104 मते 'नोटा'ला आहेत.
प्रभाग 9 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव जागेवर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या रुपाली दातरंगे यांना 5546 मते आहेत, तर पराभूत भाजपच्या पद्मा बोरुडे यांना 5068 मते आहेत. या प्रभागात 'नोटा'ला 482 मते आहेत. प्रभाग 8 क सर्वसाधारण जागेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेनेचे नवनाथ कातोरे यांना 6739 मते आहेत, तर पराभूत बाबासाहेब नागरगोजे यांना 6695 मते आहेत. त्यांच्यात 44 मतांचा फरक आहे तर येथे 'नोटा'ला 213 मते आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.