Bajrang Sonwane News : बीडचे खासदार बजरंग सोनवणे अडचणीत ? कोर्टात याचिका दाखल; 'हे' आहे कारण

Political News : पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यानंतर खंडपीठाने सोनवणे यांना नोटीस बजावली आहे.
Bajrang Sonwane
Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

Chattrapti Sambhajinagar News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यानंतर खंडपीठाने सोनवणे यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार येत्या चार आठवड्यात त्यांना उत्तर देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. (Bajrang Sonvane News)

जातीयनिहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या तीन दिवस आधी अचानक 7 बूथ जाहीर झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला, हे बूथ नोटिफायड नव्हते, असाही आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

Bajrang Sonwane
Mahayuti News : गंगापुरहून महायुतीमध्ये ठिणगी; भाजपच्या बंब यांच्या विरोधात उतरणार अजितदादांचा आमदार

या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने खासदार बजरंग सोनवणे यांना नोटीस बजावली आहे. बजरंग सोनवणे यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात या नोटीसीला ते काय उत्तर देणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bajrang Sonwane
MVA News : महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; भाकपने मागितल्या 15 जागा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com