Beed News : बीड नगरपरिषदेला मिळालेल्या 40 कोटींच्या निधीवरून रणकंदन; भाजपकडून विशेष सभेची मागणी

Beed Bjp Politics: बीड नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून केवळ बैठकांचा दिखावा केला जातो. सभेत झालेल्या विषयांवर, जनतेच्या प्रश्नावर कुठलीच कारवाई सत्ताधारी पक्ष किंवा नगराध्यक्षांकडून केली जात नाही, असा थेट आरोप भाजपच्या गटनेत्या सारिका क्षीरसागर यांनी केला होता.
Sarika Kshirsagar.jpg
Sarika Kshirsagar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed news : बीड नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून केवळ बैठकांचा दिखावा केला जातो. सभेत झालेल्या विषयांवर, जनतेच्या प्रश्नावर कुठलीच कारवाई सत्ताधारी पक्ष किंवा नगराध्यक्षांकडून केली जात नाही, असा थेट आरोप भाजपच्या गटनेत्या सारिका क्षीरसागर यांनी केला होता. आता बीड नगरपालिकेला मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या 40 कोटी रुपयांच्या निधीवरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपने घेरले आहे.

या निधीतून बीडकरांना दिलासा देणाऱ्या पाणी, वीज, कचरा प्रश्नावर खर्च करा, अशी मागणी करत या निधीच्या कामाच्या नियोजनासाठी बीड नगरपालिकेची विशेष सभा बोलवा, अशी मागणी सारिका क्षीरसागर यांनी आजच्या सभेत केली. बीड नगरपरिषदेची गुरुवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा 15 व्या वित्त आयोगाच्या 40 कोटींच्या निधीवरून चांगलीच गाजली.

निधीचा वापर पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेसाठीच व्हावा आणि यासाठी विशेष सभा आयोजित करावी, अशी आक्रमक मागणी भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी लावून धरली. 2023 ते 2026 या कालावधीत लोकनियुक्त मंडळ नसल्याने महावितरणची व्याजासह तब्बल 52 कोटी रुपयांची वीज थकबाकी झाली आहे. मूळ थकबाकी निश्चित करून वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिल भरल्यास शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटू शकतो.

तसेच पिंपळगाव व काडीवडगाव योजनांसाठी अतिरिक्त वीजभार देणे, बिंदुसरा व करपरा नदीतील सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणे आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी बायोगॅस व एमआरएफ प्रकल्प उभारण्याची मागणी त्यांनी केली.

Sarika Kshirsagar.jpg
CJP Protest News: 'कॉक्रोच जनता पार्टी'ची राजधानी दिल्लीतून मोठी घोषणा, मोदी सरकारचं टेन्शन वाढलं, लाठीचार्ज महागात पडणार?

​यावर उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी वीज बिल व्याजमाफीचा निर्णय विधिमंडळात प्रलंबित आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची तातडीची कामे हाती घेऊन प्रत्येक प्रभागाला समान निधी दिला जाईल असे स्पष्ट केले.

दरम्यान, डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या मागणीची दखल घेत 15 व्या वित्त आयोगाच्या निधी नियोजनासाठी लवकरच विशेष सभा आयोजित करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. सभेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. पाणीपुरवठ्याच्या कामाचे तुकडे पाडून प्रभागनिहाय निधी देण्याच्या उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्या निर्णयाला स्वच्छता सभापती निजाम शेख यांनी तीव्र विरोध दर्शवला.

यावरून स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे आणि शेख यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विषय मतदानापर्यंत गेला होता; मात्र इतर गटनेत्यांचा पाठिंबा पाहून नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याने मतदानाचा प्रसंग टळला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com