Beed NagarPalika : बीडच्या सत्तेत क्षीरसागर घराण्याची पुन्हा एन्ट्री होणार? योगेश अन् संदीप यांच्या युतीसाठी वरिष्ठ पातळीवरून फिल्डिंग

Beed municipality politics : बीड नगरपालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शरद पवार गटात युतीच्या हालचाली सुरू असून उपनगराध्यक्ष व समित्यांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Beed municipal election results reshape local politics as BJP and NCP Sharad Pawar explore alliances
Beed municipal election results reshape local politics as BJP and NCP Sharad Pawar explore alliancesSarkarnama
Published on
Updated on

Local Body Election Beed News : बीड नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. गेल्या 35 वर्षांपासून पालिकेची सत्ता राखलेल्या क्षीरसागर घराण्याने आता उपनगराध्यक्षपदाच्या माध्यमातून सत्तेत सहभागासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीत जरी 'आमने-सामने'लढत झाली असली, तरी सत्तास्थापनेसाठी आता वरिष्ठ पातळीवरून 'युती'साठी फिल्डिंग लावली जात आहे.

नुकतेच भाजप नगरसेवकांच्या बैठकीत पालिकेतील गटनेतेपदी डॉ. सारिका क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अत्यंत कमी कालावधीत पक्षाची बांधणी करून यश मिळविल्याबद्दल जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी मंजूर झाला. भाजपने गटनेता निवडीत आघाडी घेतली असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अद्याप गटनेता निवडलेला नाही.

विजयसिंह पंडितांची ग्रामीणमध्ये एन्ट्री

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पालवण येथे जाऊन संजय पवार यांच्याकडून त्यांनी स्वीकारलेला सत्कार, हा लिंबागणेश गटातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवारीच्या दृष्टीने टाकलेले पाऊल मानले जाते. योगेश क्षीरसागर यांनी पालिकेत घेतलेल्या भूमिकेमुळे विजयसिंह पंडित यांचा बीडमधील वावर आता विस्तारत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

स्थानिक पातळीवर 'युती' कठीण

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह सर्वाधिक 19 जागा जिंकल्या असून, युतीमधील शिवसेनेचे 3 नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र, उपनगराध्यक्ष, स्थायी समिती व विषय समित्यांच्या स्थापनेसाठी लागणारे पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 15 जागा, तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने 12 आणि मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक जागा जिंकली आहे. काँग्रेस व एमआयएमनेही प्रत्येकी 1 जागा मिळवत खाते उघडले आहे.

Beed municipal election results reshape local politics as BJP and NCP Sharad Pawar explore alliances
Local Body Election News : 'बाप से बेटा सवाई', जिथे वडील हरले, तिथेच मुलांनी विजय खेचून आणला

दरम्यान, दोन्ही क्षीरसागरांनी सत्तेसाठी एकत्र यावे, असा सूर योगेश क्षीरसागरांच्या समर्थकांचा आहे. मात्र, 'क्षीरसागर एकच'हा संदेश गेल्यास तो संदीप क्षीरसागरांसाठी राजकीयदृष्ट्या तोट्याचा ठरू शकतो. दुसरीकडे शरद पवार गटाच्या निम्म्याहून अधिक मुस्लिम नगरसेवकांनी 'आम्हाला भाजपसोबत (BJP) नको'अशी भूमिका मांडली आहे. सत्तेतील राष्ट्रवादीसोबत जाणे त्यांना अधिक सोयीचे वाटते.

Beed municipal election results reshape local politics as BJP and NCP Sharad Pawar explore alliances
Maharashtra Political Updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

तर निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपामुळे स्थानिक पातळीवर एक येणे कठीण असले तरी, राज्यातील 'महायुती'च्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 30 वर्षांहून अधिक काळ पालिकेवर डॉ. भारतभूषण क्षीरसागर व डॉ. दीपा क्षीरसागर यांचे वर्चस्व राहिले आहे. आता बदललेल्या परिस्थितीत सत्ता कोणाच्या हाती जाते आणि कोणते नवीन समीकरण जुळते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com