Local Body Election News : 'बाप से बेटा सवाई', जिथे वडील हरले, तिथेच मुलांनी विजय खेचून आणला

Phulambri politics : फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत वडिलांच्या पराभवाचा बदला घेत मुलांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या निकालाने पिढीजात राजकारण आणि भावनिक संघर्ष अधोरेखित झाला.
Victorious candidates Sushamesh Pradhan and Prashant Nagre celebrate their win in the Phulambri Nagar Panchayat Election 2025, marking a symbolic generational political comeback.
Victorious candidates Sushamesh Pradhan and Prashant Nagre celebrate their win in the Phulambri Nagar Panchayat Election 2025, marking a symbolic generational political comeback.Sarkarnama
Published on
Updated on

Phulambri Election News : फुलंब्री नगरपंचायत निवडणूक 2025 ने शहराच्या राजकारणाला अनेक भावनिक आणि ऐतिहासिक घटनांची किनार आहे. 2017 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांनी आठ वर्षांनंतर त्याच राजकीय मैदानात विजय मिळवत वडिलांचा सन्मान पुन्हा मिळवला. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय निकाल न राहता पिढ्यान्‌पिढ्यांच्या संघर्षाची यथो गाठाही ठरली आहे.

2017 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राजू प्रधान आणि राजेंद्र नागरे यांनी भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने लागला नाही आणि दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव त्यांच्या राजकीय वाटचालीतील एक कटू अनुभव ठरला. त्या काळात त्यांच्या मुलांच्या मनातही हा पराभव खोलवर रुजला होता. एक दिवस वडिलांचा सन्मान पुन्हा मिळवायचा, हीच भावना त्यांना पुढे नेणारी ठरली.

यानंतरच्या काळात राजकारणात सक्रिय राहून अनुभव घेत, लोकसंपर्क वाढवत आणि जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडले जात 2025 च्या निवडणुकीत राजू प्रधान यांचे पुत्र सुषमेश प्रधान आणि राजेंद्र नागरे यांचे पुत्र प्रशांत नागरे हे दोघेही महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले. प्रचाराच्या काळात त्यांनी विकासकामे, पारदर्शक कारभार, युवकांचे प्रश्न आणि फुलंब्रीच्या सर्वांगीण प्रगतीचा मुद्दा ठामपणे मांडला.

निवडणुकीच्या निकालात सुषमेश प्रधान यांनी भाजपचे (BJP) उमेदवार सुमित प्रधान यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. तर प्रशांत नागरे यांनी विद्यमान उपनगराध्यक्ष गजानन नागरे यांचा पराभव करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली. विशेष म्हणजे, ज्या जागी आणि ज्या राजकीय पार्श्वभूमीवर 2017 मध्ये वडिलांना पराभव स्वीकारावा लागला होता, त्याच ठिकाणी मुलांनी विजय मिळवल्याने या निकालाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Victorious candidates Sushamesh Pradhan and Prashant Nagre celebrate their win in the Phulambri Nagar Panchayat Election 2025, marking a symbolic generational political comeback.
Chhatrapati Sambhajinagar News : बाल सुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकारी निलंबित!

या विजयामुळे फुलंब्री शहरात 'जिथे वडील हारले, तिथेच मुलं जिंकले' अशी चर्चा सुरू आहे. नागरिक आणि समर्थकांच्या मते, हा विजय केवळ निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नसून तो संघर्ष, संयम आणि नव्या पिढीच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. अनेकांनी हा निकाल फुलंब्रीच्या राजकारणात बदलत्या नेतृत्वाचा आणि तरुण पिढीला मिळालेल्या संधीचा संकेत मानला आहे.

Victorious candidates Sushamesh Pradhan and Prashant Nagre celebrate their win in the Phulambri Nagar Panchayat Election 2025, marking a symbolic generational political comeback.
Mharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने फडणवीस-शिंदेंना धडकी भरली का? महाराष्ट्रात नवं राजकीय पर्व

पराभवाच्या जखमेवर विजयाची फुंकर..

फुलंब्री नगरपंचायत निवडणूक 2025 ही पराभवाच्या जखमेवर विजयाची फुंकर घालणारी ठरली असून, वडिलांच्या अपयशाला यशात रूपांतरित करणाऱ्या मुलांच्या या विजयाने फुलंब्रीच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 चे सुषमेश प्रधान आणि प्रभाग क्रमांक 15 चे प्रशांत नागरे यांच्या विजयाची राजकीय वर्तुळाच चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com