Yogesh Kshirsagar : निवडणूक संपताच जयदत्त क्षीरसागरांना 'टाटा, टाटा-बाय, बाय' : योगेश क्षीरसागरांनी काकांना केले बायपास

Beed Politics : बीड नगरपालिका निकालानंतर योगेश क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागरांना दूर ठेवत नवे राजकीय समीकरण उभे केले असून भाजपमधील अंतर्गत राजकारणाची चर्चा रंगली आहे.
Yogesh Kshirsagar during Beed municipal election celebrations, as absence of Jaydatt Kshirsagar sparks discussion over internal family politics and BJP’s evolving local leadership dynamics.
Yogesh Kshirsagar during Beed municipal election celebrations, as absence of Jaydatt Kshirsagar sparks discussion over internal family politics and BJP’s evolving local leadership dynamics.Sarkarnama
Published on
Updated on

Beed local body politics news : बीड जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर 3 वर्षांपासून पक्षाविना आहेत. नगर पालिका निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला. पण, शेवटपर्यंत त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठापासून दूर रहावे लागले. निवडणूक संपली तरीही प्रवेश मिळाला नाही. आता ज्यांच्यासाठी त्यांनी निवडणुकीत जिवाचे रान केले त्या पुतणे डॉ. योगेश क्षीरसागरांनी त्यांना बायपास केल्याचे दिसते.

विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करणाऱ्या समाज माध्यमांवरील पोस्टच्या बॅनरवरही त्यांच्या फोटोला स्थान नाही. 3 वर्षांपूर्वी क्षीरसागर यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली. त्यावेळी डॉ. भारतभूषण क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर सोबतच होते. पण, राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर डॉ. क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काका मात्र पक्षाविनाच होते.

विधानसभा निवडणुकीत स्वतःला पक्ष नसल्याने निवडणुकीतून माघार घेतलेल्या माजी मंत्री क्षीरसागरांनी पुतणे डॉ. योगेश क्षीरसागरांचा प्रचार केला. आता नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरुवातीला त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच पुणते डॉ. योगेश यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप गाठले.

Yogesh Kshirsagar during Beed municipal election celebrations, as absence of Jaydatt Kshirsagar sparks discussion over internal family politics and BJP’s evolving local leadership dynamics.
MIM News: एमआयएमचा पतंग जोरात! महापालिकेसाठीची पहिली यादी जाहीर करत घेतली आघाडी

दरम्यान, निवडणुकीतही पुतणे भाजपचे (BJP) नेतृत्व करत असल्याने त्यांनी पुतण्याची साथ दिली आणि विविध ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. त्यावेळीही पक्षाच्या मुख्य बॅनरवर त्यांचा फोटो नव्हता. बीड दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे त्यांनी स्वागत केले पण व्यासपीठापासून ते दुरच होते. दरम्यान, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करणारी पोस्ट आपल्या अधिकृत समाज माध्यमावर टाकली.

Yogesh Kshirsagar during Beed municipal election celebrations, as absence of Jaydatt Kshirsagar sparks discussion over internal family politics and BJP’s evolving local leadership dynamics.
Beed Fire News: बीडमधील धक्कादायक घटना! अभिनेते सयाजी शिंदेंच्या देवराईला भीषण आग; पर्यावरणप्रेमींचा संताप,आग कुणी लावली?

यामध्ये भाजपचे प्रमुख नेते, दिवंगत काकू व नाना, तसेच वडिलांच्या फोटोसह भाजपमधील बीडच्या स्थानिक नेते आणि नगराध्यक्षपदाच्या पराभूत उमेदवारांच्या फोटोला जागा देणाऱ्या पुतणे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो टाळला आहे. एकिकडे बडे पक्ष टाळत असताना आता पुतणेही क्षीरसागरांना बायपास का करत आहेत, याचे कोडे क्षीरसागरांच्या समर्थकांना पडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com