Beed News : विशाळगड प्रकरणी बीड जिल्ह्यात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर; सरकार विरोधात घोषणाबाजी

Muslim community protest Against Government : बीडमध्ये बशीरगंज येथे समाज बांधव हातात काळे झेंडे घेऊन एकत्र आले. यावेळी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
beed muslim community protestt
beed muslim community protestsarkarnama
Published on
Updated on

Beed News : विशाळगड-गजापूर प्रकरणाचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यात उमटले आहेत. शुक्रवारी केजमध्ये बंद तर बीडमध्ये दुपारची नमाज अदा केल्यानंतर हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. गेवराईतही भव्य मोर्चा काढण्यात आला.

बीडमध्ये बशीरगंज येथे समाज बांधव हातात काळे झेंडे घेऊन एकत्र आले. यावेळी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'सरकार आणि प्रशासन मुर्दाबाद' अशा घोषणा देत मुस्लिम समाज बांधव प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते. हातात तिरंगा ध्वज आणि निषेधासाठी काळे झेंडे, डोक्याला काळ्या प‌ट्ट्या बांधून रस्त्यावर उत्तरलेल्या समाज बांधवांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड गजापूर येथील हिंसाचाराचा निषेध नोंदवला.

मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांसह मुस्लिम घरांना लक्ष्य करणाऱ्या समाजकंटक हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करा, त्यांच्याविरुध्द 'यूएपीए' अंतर्गत कारवाई करा आणि मुस्लिमांना संरक्षण द्या, अशी एकमुखी मागणी यावेळी संतप्त जमावाकडून करण्यात आली. शहरातील बशीरगंज चौकात 'एमआयएम'च्या वतीने शुक्रवार दुपारी 2 वाजता विशाळगड-गजापूर हिंसाचाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.

केजमध्येही विशाळगड व गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने पुढारलेला बंद केज शहरात उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला. शहरातील दर्ग्यापासून दुपारी काढण्यात आलेल्या निषेध फेरीत मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकार व प्रशासनाविरोधात दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.

दर्ग्यापासून निघालेली निषेध फेरी आंबेडकर चौकातून मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयात धडकली. यावेळी राज्य शासन व प्रशासनाविरोधात हातात तिरंगा ध्वज घेऊन जोरदार घोषणाबाजी करत विशाळगड व गजापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने नायब तहसीलदार आशा वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेवराईत मुर्दाबाद, मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार, मुर्दाबाद नही चलेंगी, नही चलेंगी, दादा गिरी नही चलेंगी, अश्या जोरदार घोषणांनी परिसर दणानून गेला. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते तहसिल कार्यालय परिसर समाज बांधवांनी दणाणून सोडत गजापूर येथे झालेल्या अमानूष हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात नुकसानग्रस्त लोकांना तात्काळ मदत करुन घटनेला जबाबदार असणाऱ्यांना अटक करुन न्याय द्यावा. या मागणीचे निवेदन प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार संदिप खोमने यांना देण्यात आले.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com