Maratha Reservation News
Beed: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आता ते आज पुन्हा एकदा दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यांची बैठक बीडमधील वाणगाव फाटा येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis)त्यांनी टीकास्त्र डागले. फडणवीसांनी त्यांनी पुन्हा इशारा दिला.
"फडणवीसांनी पोलिसांचे कान फुकण्याचे बंद करावे. आमचे बॅनर, पोस्टर काढण्याच्या सूचना ते देत आहेत, पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहे, आमच्या घराला पत्रक चिटकवायचे आहे, आता ते आम्ही सहन करणार नाही. आता यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही, अशी मोहीम आम्ही राज्यभर चालवणार आहोत. गाड्यांवर देखील हेच घोषवाक्य लिहिले जाणार आहे," असा इशारा जरांगेंनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"माझ्या आंदोलनामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे तेच शरद पवार यांना अंतरवालीतून रस्ता बदलून जावे लागले असे सांगतात. मराठा समाजाविषयी त्यांच्या मनातच द्वेष आहे, तो द्वेष आता सर्व समाजाने पाहिला आहे. मी समाजाशी प्रामाणिक आहे, परंतु माझ्या विरोधात सर्वजण एकत्र आले आहेत. माझी एकच मागणी आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation News) ओबीसीतून आधी सूचनेनुसार आरक्षण द्या, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा आंदोलन उभारू," असा इशारा त्यांनी यावेळी दिला. "मला आत टाकूनच दाखवा, मग तुम्हाला कळेल लाट काय असते?,असे ते म्हणाले.
बीडमध्ये मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्याच्यावर मी काही बोलणार नाही, तो निर्णय समाजाने घेतला आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. "माझी भूमिका राजकीय नाही, समाज माझा मालक आहे. बीड जिल्ह्यात 3400 उमेदवारांचे फॉर्म झाले आहेत असं म्हणत घ्या अत्ता डबरीवर बॅलेट पेपर अंथरणार का? आत्ता आमच्या वावरात मतदान केंद्र टाकावे लागणार असे म्हणत कसे आमच्या वावरात येतात बघतो,"
जरांगे म्हणाले, "जुन्या काळात आत्या कान भरवायचं काम करायची, ती भूमिका आता फडणवीस करीत आहेत. त्यांनी पोलिसांचे कान भरून मराठा समाजातील तरुणांना खटले दाखल करीत आहेत, बॅनर काढायला लावत आहे, त्यांचा हा डाव फेल जाणार आहे. मी यांच्या या डावापुढे हरणार नाही. आठ नऊ तारखेपर्यंत मजा बघतो मग कामाला लागतो, त्यांनी मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नये. अन्यथा मराठ्यांशी गाठ आहे,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.