Ajit Pawar : अजितदादांच्या 'एजन्सी'चे दुर्लक्ष : पक्ष झाला टीकेचा धनी! ‘स्टार’ प्रचारक कुठे?

NCP Ajit Pawar election campaign Consulting Company: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचार वेगवान पद्धतीने व्हावा, आणि सर्वांपर्यंत माहिती पोचावी, यासाठीचे काम स्वतंत्र सल्लागार कंपनीला दिले. पण संबंधित कंपनी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचेच दिसून आले आहे.
NCP Ajit Pawar
NCP Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पांडुरंग म्हस्के

निवडणुकांचा हंगाम सुरू झाला की सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांना बळ येत असते. त्यातूनच स्थानिक पातळीवर प्रचाराची सुरुवात होते असते. निवडणुकीसाठी पक्षाचे पदाधिकारी प्रचाराचे धोरण ठरवितात. त्या नुसार प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी दिली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यासाठी पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यालयीन सचिव आणि अन्य पदाधिकारी कर्मचारी यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.

राज्यभर फिरून लाडकी बहीण योजनेचा चांगला प्रचार आणि प्रसार केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात मात्र पक्षाचा प्रचार अजूनही म्हणावी तशी झेप घेऊ शकलेला नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पक्षात असलेला समन्वयाचा अभाव. पक्षाच्या प्रचाराची नीती बनविण्यासाठी नेमण्यात आलेल्या खासगी कंपनीचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सूर जुळले नसल्याने किंवा खासगी कंपनी कार्यकर्त्यांना विचारात न घेता त्यांना गृहीत धरून निर्णय घेत असल्याने अनेकदा पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

NCP Ajit Pawar
BJP On Hindutva: 'हिंदुत्वाचे कार्ड' कुणाचे पत्ते ओपन करणार; 'व्होट जिद्दाद' भाजपला तारणार का?

खासगी कंपनीकडून सुरू असलेला प्रचार हा केवळ पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याभोवतीच फिरत आहे. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त पक्षाला प्रदेशाध्यक्ष आहेत. अनेक दिग्गज नेते पक्षात असून ते या निवडणुकीत ‘स्टार’ प्रचारक आहेत. त्यांच्याबाबतची माहिती कोठेही प्रसारित होताना दिसत नाही.

दौऱ्यांची माहितीच नाही

राज्यातील जवळपास ७२- ७३ मतदार संघ असे आहेत, ज्याठिकाणी आदिवासी मतदार निर्णायक ठरू शकतात. अशा वेळी पक्षाच्या आदिवासी नेत्यांना ‘स्टार’ प्रचारक करण्यात आले आहे, मात्र त्यांच्या दौऱ्याची माहिती किंवा आदिवासी मतदारांना कसे आकर्षित करायचे याची माहिती ना समाज माध्यमांवर मिळते, ना वर्तमानपत्रातून. तीच गोष्ट मुस्लिम मतदारांबाबत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, वास्तविक पक्षाला मिळालेल्या ५६ जागांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास १० टक्के आहे, मात्र अद्यापही या गोष्टीचे भांडवल करण्याचे पक्षाच्या प्रचार चमूला किंवा नेत्यांना साधलेले नाही.

NCP Ajit Pawar
Hadapsar Assembly Election 2024: मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय; हडपसरच्या राजकारणात मोठी घडामोड

सेलेब्रिटींचा प्रचारात वापर

पक्षाने नुकतेच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी गाजवलेले मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यांचाही वापर निवडणूक प्रचारात करण्यात येत आहे. मूळचे साताऱ्याचे असलेले शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, पक्षाचे सदस्य आणि पदाधिकारी असलेले गार्गी फुले, प्रभाकर मोरे हे सुद्धा प्रचारात सहभागी होणार आहेत. भाऊ कदम आणि प्रभाकर मोरे यांना कोकण आणि परिसरात काही दिवस प्रचारासाठी फिरविण्यात येणार आहे. कोकणात पक्षाचे तीन उमेदवार श्रीवर्धन, शहापूर आणि चिपळूण या मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.

यंत्रणांचे अपयश

वास्तविक निवडणुकीत प्रचार करणे म्हणजे केवळ मतदारांपर्यंत पोचून आश्वासने देणे किंवा पक्षाची चांगली माहिती जनतेपर्यंत पोचविणे एवढेच काम नाही, तर पक्षाची बदनामी थोपविणे हे देखील प्रचार यंत्रणेचे महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी एखाद्या बदनामीकारक गोष्टीची वाट पाहत बसू नये. त्यासाठी सभोवार बारकाईने लक्ष ठेवून संभाव्य बदनामीचा अंदाज घेऊन त्याबाबत आधीच उपाय योजना करणे हे सर्वांत मोठे काम असते. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे नुकतेच प्रकाशित झालेले '2024 :The Election That Surprise India,’ या पुस्तकात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्ष सोडून जाण्याबद्दलची आणि भाजपची साथ देण्याबद्दलची कारणमीमांसा दिली आहे.

खुद्द भुजबळ यांनीच याचा खुलासा केल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. किती वर्ष ‘ईडी’ आणि अन्य यंत्रणांच्या नोटिशीला उत्तर देत बसायचे असे भुजबळ म्हणाल्याचा उल्लेख यात आहे. मात्र या पुस्तकात असा काही उल्लेख आहे, याची खबरबातच पक्षांच्या यंत्रणांना नाही. पक्षाची प्रतिमा बांधणी करणाऱ्या ‘एजन्सी’ने याबाबत दक्षता दाखवली असती, तर पक्षाला टीकेचे धनी व्हावे लागले नसते.

NCP Ajit Pawar
Uddhav Thackeray Exclusive Interview: ठाकरे पुन्हा CM होणार की शिवसैनिकाला CM करणार? VIDEO पाहा

समन्वयाचा अभाव

पक्षाच्या प्रचारासाठी पैसे मोजून नेमण्यात आलेल्या कंपनीचा आणि कार्यालयीन कर्मचारी किंवा पदाधिकारी यांच्यात संवाद नसल्याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे पक्षाचा जाहीरनामा, काही दिवसांपूर्वी पक्षाने निवडणुकीचा वचननामा जाहीर केला. या वचननाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पक्ष म्हणून सत्तेत आल्यावर काय करणार याबाबत आश्वासने देण्यात आलेली आहेतच, परंतु पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात काय करणे गरजेचे आहे याचाही उल्लेख यात करण्यात आला आहे.

पक्षाच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख असलेल्या ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे -पाटील यांच्या मतदारसंघाचा यात उल्लेखच नाही. अन्य चार आमदारांच्या मतदार संघांचाही यात उल्लेख नाही, याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारले असता, जाहीरनाम्याबाबत त्यांना काहीच माहिती नसल्याचे समजले.सर्व नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रचार आणि प्रसाराच्या कामात सहभागी करून घेतले असते, तरी किमान प्रचारात तरी पक्षाला बाजी मारता येणे शक्य झाले असते.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com