

Beed Parli Municipal Election : बीडच्या परळी नगरपालिका निवडणूक मतदानानंतर देखील गाजत आहे. परळीच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामना रंगला आहे.
मतदानानंतर स्ट्राँग रूममधील 'ईव्हीएम' सुरक्षेवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख आक्रमक झाले असतानाच, आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्षपद बाजीराव धर्माधिकारी यांचा काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
बाजीराव धर्माधिकारी यांचा व्हायरल झालेल्या काॅल रेकाॅर्डिंगमध्ये वाल्मिक कराड याचा बेल होणार असून, नगरपालिका निवडणुकीत (Election) दीपक साहेबांच्या रडारवर आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या काॅल रेकाॅर्डिंगवर दीपक देशमुख यांनी प्रतिक्रिया देत, परळी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु पोलिसांकडे अर्ज जमा केला असून, त्यात जीविताला धोका असल्याचं म्हटलं आहे.
परळीतील माजी नगराध्यक्ष आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्ती बाजीराव धर्माधिकारी यांच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक अण्णा सुटणार आहे. अण्णांची बेल होणार आहे. सगळं व्यवस्थित होणार आहे, असे म्हणत आता दीपक सोबत फिरू नका, तो साहेबांच्या रडारवर आहे. तुम्ही सगळं पाठीमागे पाहिलं आहे ना, काय झालं ते! असं म्हटलं आहे.
व्हायरल झालेल्या या काॅल रेकाॅर्डिंगमुळे परळीत खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या एकट्याच्या जीविताला भिती नसून, यांचं न ऐकलेले माझ्यासोबत निवडणुकीला उभे राहिले आहेत, त्या सर्वांनाची भीती असल्याचा दावा केला आहे.
संबंधित कॉल रेकॉर्डिंग संदर्भात परळी पोलिस तक्रार घ्यायला तयार नाहीत. माझ्या जीविताला अशा लोकांपासून धोका आहे. हे जसं म्हणतील तसंच ऐकावं लागतं. हम करे सो कायदा आहे इथं. दीपक देशमुख धनंजय मुंडे यांच्या रडारवर आहे, असे संबंधित कॉल रेकॉर्डिंगमध्ये म्हटल्याचं स्पष्ट ऐकायला येत असल्याकडे दीपक देशमुख यांनी लक्ष वेधलं.
वाल्मिक अण्णा जेलमधून बाहेर येणार आहे आणि सर्व काही साफ करणार आहे. मात्र कोणाला साफ करणार आहेत हेही सांगा, असा प्रश्न केला. मला या अगोदरही अशाच पद्धतीने धमक्या आल्या. पोलिसांना या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात दोन वेळा तक्रार केली. पण घेतली नाही. आता पोलिसांकडे अर्ज जमा करून आलो आहे. त्यात जीविताला धोका असल्याचे आपण म्हटल्याचं दीपक देशमुख यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.