Munde vs Dhas : पंकजाताईंना बीड, राज्य, देशाचे प्रश्न विचारू नका, त्यांची कॅटेगरी इंटरनॅशनल; सुरेश धसांचा संताप

Maharashtra Suresh Dhas BJP Minister Pankaja Munde Santosh Deshmukh murder case political crime Beed : बीडमधील राजकीय गुन्हेगारी आणि संतोष देशमुख हत्येत भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या मौन भूमिकेवर आमदार सुरेश धस यांची टीका.
Munde vs Dhas
Munde vs Dhas Sarkarnama
Published on
Updated on

Beed political crime : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. क्रूरपणाचा हा कळस समोर येताच संपू्र्ण महाराष्ट्र हळहळला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा जोर वाढला असून, त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जाते.

बीडमधील राजकीय गुन्हेगारीवर भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत भाष्य करणे टाळले आहे. यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा संताप व्यक्त केला. "पंकजाताईंना बीड, राज्याचे आणि देशाचे प्रश्न विचारू नका. इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झाली आहे, त्यामुळे त्यांना इंटरनॅशनल प्रश्न विचारा", अशी खोचक टीका सुरेश धस यांनी केली आहे.

बीडमधील राजकीय गुन्हेगारीवर आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणात भाजप (BJP) मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. वेळ आल्यावर बोलू, मला माहिती नाही, माहिती घेऊन सांगते, असे म्हणून आतापर्यंत टाळत आल्या. पुणे दौऱ्यावर असताना देखील त्यांना बीडमधील राजकीय परिस्थितीवर विचारले, असता मंत्री मुंडेंनी माध्यम प्रतिनिधींना फटकारले होते. सुरेश धस यांनी तोच धागा पकडून, पंकजा मुंडेंवर खोचक टीका केली.

Munde vs Dhas
Maharashtra Budget Session : राज्यपालांनी महायुती सरकारच्या वाटचालीची दिशा सांगितली, कृषी धोरण ते शक्तिपीठ...

आमदार सुरेश धस म्हणाले, "पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. आज देशात, जगात पर्यावरणाचे पाहावं लागतं. बीड (BEED) जिल्ह्याचे प्रश्न विचारू नका. कारण त्यांना बीड जिल्ह्याचे काही सोयरे-सुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील, डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन, पुतीन, गाझा पट्टी, जर्मनी इतर देशांबद्दल, तिथलं हवामान-वातावरण कसं आहे, याबद्दल प्रश्न विचारले पाहिजे".

Munde vs Dhas
Maharashtra Politics News live : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारहाणीचे फोटो आले समोर

'इतकी दुर्दैवी घटना घडली आहे. पंकजाताईंना विनंती आहे की, तीन महिने झाले, आता तरी मस्साजोग इथं देशमुख कुटुंबियांना भेटून या. धनंजय देशमुख, संतोष देशमुख कोण आहे? भाजपचा स्वतः बुथप्रमुख, कालच्या लोकसभा निवडणुकीत संतोष एका बुथवर थांबला होता. धनंजय देखील एका बुथवर थांबला होता', याची आठवण सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडेंना करून दिली.

'पंकजाताईंकडून किमान स्वतःच्या बुथप्रमुखाच्या बाबतीत, तरी इतकी असंवदेनशील वक्तव्य होईल, असे मला वाटलं नव्हतं. पुण्यात त्या म्हणतात, बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारता, पुण्याचे विचारा, त्याच्यापेक्षा मी म्हणतो, बीडचेच नव्हे, राज्याचे आणि देशाचे देखील त्यांना प्रश्न विचारू नका. इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झाली आहे, त्यांना इंटरनॅशनल प्रश्न विचारा', असा खोचक टोला सुरेश धस यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com