Beed Political News : राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट, कोणताच गट फिरकेना..

Ncp : अजित पवारांच्या गटाकडे तीन आमदार तर शरद पवार यांच्यासोबत एक आमदार असल्याचे स्पष्ट झाले.
Beed Ncp Political News
Beed Ncp Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होऊन राज्यात नवे राजकीय समीकरण उदयास आले. (Beed Ncp Political News) या घटनेला आठवडा उलटला, राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून राज्यात शरद पवार, अजित पवार दोन्ही घट आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. गोंधळ आणि हाणामाऱ्यांचे प्रकारही घडले. मात्र, बीड राष्ट्रवादीच्या अलिशान चार मजली कार्यालयात मात्र शुकशुकाट आहे.

Beed Ncp Political News
Beed News : वाळू, वेश्याव्यवसाय, गुटखा अन् पत्यांचे क्लब, बड्या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे धंदे..

ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटाकडील कोणीही या कार्यालयात आठ दिवसांत फिरकलेले नाही. (NCP) मागच्या रविवारी अजित पवार यांनी नऊ आमदारांसह राज्याच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला. यात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. (Beed News) त्यानंतर बुधवारी (ता. पाच) समर्थकांचा मुंबईत मेळावाही घेतला. याच दिवशी शरद पवार यांनीही मुंबईत मेळावा घेतला.

या मेळाव्यानंतर कोण - कोणाकडे हे चित्र जवळपास स्पष्ट झाले. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आहेत. (Marathwada) यातील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या राजकीय घडामोडीच्या दुसऱ्याच दिवशी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुंबईतील मेळाव्याला गेवराईचे आमदार प्रकाश सोळंके व आष्टी/पाटोदा/शिरूर कासारचे आमदार बाळासाहेब आजबे देखील हजर होते.

एकूणच अजित पवारांच्या गटाकडे तीन आमदार तर शरद पवार यांच्यासोबत एक आमदार असल्याचे स्पष्ट झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण देखील अजित पवार यांच्या गटाकडे आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतःच्या मालकीचे कार्यालये आहेत. यात बीड जिल्ह्यात देखील बार्शी रोडवर पूर्वेला पक्षाचे चार मजली भव्य व अलिशान कार्यालय आहे.

मात्र, मागील आठ दिवसांपासून या कार्यालयाकडे दोन्ही गटांपैकी कोणत्याच गटाचे नेते फिरकले नाहीत. नाशिक, पुणे, नागपूर आदी ठिकाणी पक्षाचे कार्यालयावर कोणाची ताबा यावरुन भांडणांचे प्रकार घडले आहेत. बीडमध्ये मात्र कार्यालयात शांतता आहे. दोन्ही गटांकडील नेते निश्चित झाले आहेत. पक्षातून जिल्हाध्यक्ष अजित पवारांसोबत गेल्याने लवकरच शरद पवार गटाकडून पुढील कार्यवाही आणि नवा जिल्हाध्यक्ष देखील जाहीर करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com