Beed News : वाळू, वेश्याव्यवसाय, गुटखा अन् पत्यांचे क्लब, बड्या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे धंदे..

Political : पदांच्या आडून तुम्ही काहीही धंदे करा, आमचे तुम्हाला प्रोटेक्शन आहे, असाच जणू संदेश पद देताना असतो.
Beed Political News
Beed Political News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political : कलाकेंद्रांत जाण्यामुळे राजाचे रंक झाल्याची उदाहरणे गावोगावी पहायला मिळतात. मात्र, एका पक्षाचा जिल्हाप्रमुख कलाकेंद्रात पार्टनर असतो. (Beed Political News) गंभीर बाब म्हणजे कला केंद्रांच्या आडून वेश्याव्यवसाय आणि अल्पवयीन मुलींचे लैंगीक शोषण यातही तो अडकतो. असा गंभीर प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Beed Political News
Sanjay Shirsat On Notice News : विधानसभा अध्यक्षांची नोटीस ही एक प्रक्रिया, आमच्यावर कारवाई अशक्यच..

शिवसेनेच्या (Shivsena) तत्कालिन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदेंवर गुन्हा नोंद होऊन त्यांची हाकालपट्टी झाली. मात्र, माफियागीरी किंवा अवैध व्यवसायाला पक्षांच्या जिल्हाध्यक्षपदाचे सुरक्षा कवच घेणारे रत्नाकर शिंदे पहिले नेते किंवा शिवसेना (उबाठा) पहिला पक्ष नाही. (Beed News) यापूर्वीही वाळू माफियागीरी, मटका, गुटखा, पत्त्यांचे क्लब चालवणाऱ्या अनेक बड्या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.

व्हाईट कॉलरच्या आडून सामाजिक कार्याचा बुरखा पांघरणारी मंडळी व्यवसाय काय करते हे त्यांच्या बगलबच्च्यांना माहित असतेच. (Marathwada) पण, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पार्टी वीथ डिफरन्स म्हणवून घेणारे पक्ष देखील पत्त्यांचे क्लब, मटका, गुटखा माफियागीरी करणाऱ्यांना आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद देतात. या पदांच्या आडून ही मंडळी समाज पोखरुन काढत असते. केज तालुक्यातील उमरी फाटा येथील कला केंद्रांवरील छाप्यानंतर दाखल गुन्ह्यामुळे रत्नाकर शिंदे यांची शिवसेनेने हाकालपट्टी केली.

परंतु, यापूर्वी एका बड्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे नाव देखील पत्त्याच्या क्लबवरील छाप्यात समोर आले होते. कला केंद्रावर छापा टाकणाऱ्या सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनीच बीडजवळ हा छापा टाकला होता. लाखो रुपयांच्या मुद्देमालासह शिक्षकही या पत्त्याच्या क्लबमध्ये आढळले होते. आता पत्त्याच्या क्लबने समाजाचे किती भले होते आणि गरीबांच्या किती माड्या चढतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मात्र, या बड्या पक्षाने कारवाई केली नव्हती येवढेच. वाळू माफियागीरीत देखील पक्षांच्या नेत्यांना जेलची हवा खावी लागलेली आहे. आता वाळूच्या जेवढ्या हायवा चालतात त्यात अनेक पक्षांच्या सक्रीय पदाधिकाऱ्यांच्याच अनेक हायवा आहेत. दरम्यान, बीड शहरात देखील पत्त्याच्या क्लबवरील गुन्ह्यात दिड वर्षांपूर्वी एका जिल्हाप्रमुखाचे नाव समोर आले होते. पुन्हा दुसरी धाडसी कारवाई देखील पंकज कुमावत यांनीच बीड परिसरात एका शिवारातील गोदामात केली.

Beed Political News
AIMIM On CM News : राजकारणाची स्थिती पाहता मी पण मुख्यमंत्री होवू शकतो..

यात लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला. यात देखील तत्कालिन सत्तेतील एका बड्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखांचे नाव आले होते. त्यांची मात्र पक्षाने हाकालपट्टी केली. पण, पुन्हा त्यांना दुसऱ्या पक्षाने पदाचे प्रोटेक्शन दिलेच. त्यामुळे पक्षांनाही आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आमच्या पदांच्या आडून तुम्ही काहीही धंदे करा, आमचे तुम्हाला प्रोटेक्शन आहे, असाच जणू संदेश पद देताना असतो. त्यामुळे रत्नाकर शिंदे या साखळीतील केवळ एक नाव आहे.

बहुतेकजण एकाच माळेचे मनी आहेत. अलिकडे पक्षांचे पद देताना चमकोगिरीला अधिक वाव आहे. त्याचे धंदे आणि पुर्वाश्रम तर दुरच त्याचा वर्तमानही बघीतला जात नाही. पक्षातील जेष्ठता आणि निष्ठा ठेवणाऱ्यांना कवड्यांच्या माळा जपाव्या लागतात. तर, बाहेरुन आलेल्यांच्या गळ्यात पदांची माळ पडते हे अलिकडे जिल्ह्यातील बड्या म्हणवून घेणाऱ्या पक्षांतील चित्र आहे. पक्ष वाढविण्यासाठी, पक्षाची विचारधारा सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हयात घालविलेली मंडळी शेवटच्या खुर्च्यांवर असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com