Beed : वंचित-अपक्षांमुळे राजकीय विरोधक धनंजय-पंकजा मुंडे एकाच बॅनरवर

Grampanchayt Election : धनंजय व पंकजा मुंडे या दोघांचे फोटो अभय मुंडे यांच्या प्रचार बॅनरवर एकत्र आले आहेत.
Dhnanjay Munde-Pankaja Munde, News Beed
Dhnanjay Munde-Pankaja Munde, News BeedSarkarnama
Published on
Updated on

Grampanchayt Election News : नात्याने बहिण-भाऊ, पण राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकाच बॅनरवर दिसल्याने याची चर्चा रंगू लागली आहे. Beed News दिवगंत गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाथ्रा ग्रामपंचात निवडणुकीत दोघांच्याही समर्थकांना सुखावणारे हे चित्र दिसत आहे.

Dhnanjay Munde-Pankaja Munde, News Beed
Aurangabad : जिल्ह्यात चौदा सरपंच अन् ३०८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध..

वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांमुळे हे घडू शकले आहे. आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे राजकीय विरोधक कुठल्याही निवडणुकीत कायम आमने-सामने असतात. मात्र, त्यांच्या नाथ्रा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र या बहिण-भावंडांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत.

ही किमया वंचित व अपक्ष उमेदवारांमुळे घडली आहे. बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. काही ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य बिनविरोध देखील निवडले गेले. दहा वर्षांपासून धनंजय मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या मुंडेंच्या जन्मगाव नाथ्रा ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध होण्यासाठीचे प्रयत्नही काही प्रमाणात यशस्वी झाले.

नऊ पैकी आठ सदस्य बिनविरोध निवडले गेले. मात्र, सरपंचपदासाठी मुंडे भावंडांपैकीच धनंजय मुंडे यांच्या बाजूने असलेले अजय मुंडे यांचे भाऊ अभय मुंडे यांच्या विरोधातील वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांच्यासह प्रकाश मुंडे आणि रमेश मुंडे या दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे निवडणुकीला रंग आला आहे.

परिणामी दहा वर्षांपासून राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांचे फोटो अभय मुंडे यांच्या प्रचार बॅनरवर एकत्र आले आहेत. तसे पाहता ग्रामपंचायत निवडणुका ह्या राजकीय पक्षांपेक्षा गावच्या गट-तटांवर होत असतात. मात्र, राजकीय मुंडे भावंडांचे फोटो एकत्र आल्यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com