Grampanchayt Election : औरंगाबाद जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायतीतील १४ सरपंच व ३०८ सदस्य बिनविरोध झाले असून उर्वरित जागांसाठी येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. Aurangabad ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचयाती, सरपंच बिनविरोध व्हावे यासाठी मंत्री, आमदारांनी भरघोस निधी देण्याचे आश्वासन देवून देखील त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला असता २१६ ग्रामपंचयाती पैकी १४ ठिकाणचे सरपंच हे बिनविरोध निवडून आणण्यात यश आले आहे. तर ३०८ सदस्य देखील बिनविरोध झाले आहेत. आता उर्वरित (Grampanchayt) ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी ६११ उमेदवार रिंगणात आहेत. तर साडेतीन हजारांहून अधिक उमेदवार हे सदस्यपदासाठी शड्डू ठोकून आहेत.(Marathwada) येत्या १८ डिसेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे.
सर्वाधिक बिनविरोध सदस्य हे कन्नड-६३, औरंगाबाद ६१, गंगापूर ५५, तर ४६ सदस्य हे वैजापूर तालुक्यातील आहेत. गंगापूर, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यात प्रत्येकी ३ सरपंच हे बिनविरोध विजयी झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी १०९२, तर सदस्यपदासाठी ५४८१ अशा ६५७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
पैकी ३७१ जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर १९०० जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी ६११ तर सदस्यासाठी ३२२६ असे ४२३७ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. चित्र स्पष्ट झाल्यामुळे गावातील राजकीय वातावरण आता तापले असून प्रचारालाही जोर आला आहे.
आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीवर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे बारीक लक्ष असून गावगाड्यावर देखील आपल्या समर्थकांचे वर्चस्व असावे यासाठी नेतेमंडळी मदत करत असल्याचे देखील बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.