
Beed Santosh Deshmukh : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल झाले आहेत. यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आठ फोटो, 15 व्हिडिओ पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत. आता हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेत.
यातच संतोष देशमुख यांना पाईपाने मारहाण झाली. या पाईपलाचे 15 तुकडे सीआयडीने जप्त केले असून, त्याचा फोटो दोषारोपपत्रात जोडण्यात आला आहे. याशिवाय गुन्ह्याच्या तपासाला कलाटणी देणारे पुरावे सुदर्शन घुले याच्या काळ्या गाडीतून सुमारे 19 पुरावे मिळाल्याचे समोर आले आहे.
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने महाराष्ट्र हळहळला आहे. या मारहाणीमुळे त्यांच्या शरीरातले सुमारे तीन लिटर रक्त साकाळलं होते. आरोपी प्रतिक घुले आणि सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांना ज्या पाईपाने मारले त्याचे 15 तुकडे पडले. पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो सीआयडीने (CID) दोषारोपपत्रात जोडला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे इतर फोटो व्हायरल झाले असून, त्यावर संताप व्यक्त होत आहे. बीडमध्ये (BEED) आज कडकडीत बंद पाळण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचे बॅनर जाळण्यात आले. पंढरपूर, लातूर, जालना, शिर्डी, सोलापूर इथं धनंजय मुंडे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आली.
या हत्येत सुदर्शन घुले याची काळ्या रंगाचे वाहन सीआयडीला महत्त्वाचे पुरावे देऊन गेली. पोलिसांनी सुरवातीलाच हे वाहन जप्त केले होते. या वाहनातून तब्बल 19 महत्त्वाचे पुरावे सीआयडीला सापडले. आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल, या वाहनात सापडेल. त्याचबरोबर मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ आढळून आले.
तसेच काळ्या काचाचे दोन गॉगल्स, सुदर्शन घुलेने मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेट, सहा आरसी बुक, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा पाईप, लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार, रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडा देखील या वाहनात सीआयडीला सापडला. त्यानंतर गुन्ह्याचा पक्का पुरावा सीआयडीचा ताब्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.