
Beed News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तिथला सामाजिक सलोख्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. यावर सरकारकडून कोणतेही काम होताना दिसत नसताच, याच मुद्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून, सद्भावना रॅली काढण्याचे नियोजन केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आठ मार्चला मस्साजोग ते बीड अशी सद्भावना पायी रॅली काढली जाणार आहे. यानिमित्ताने बीडमध्ये सपकाळ यांचा होणारा मुक्काम चर्चेत आला आहे.
ही पायी सद्भावना रॅली आठ मार्चला सकाळी आठ वाजता मस्साजोग इथून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहून सुरवात केली जाईल. हर्षवर्धन पाटील या रॅलीत सहभागी होण्यासाठी सात मार्चला मुक्कामी असतील. त्याचवेळी नारायण गड आणि भगवान गड इथं जाऊन दर्शन घेतली. दत्ताभाऊ बारगजे यांच्या आनंदवन इथं मुक्काम करणार आहे. या रॅलीला काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, खासदार रजनी पाटील, खासदार कल्याण काळे, अमित देशमुख आदी प्रमुख नेते या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी दिली.
बीड (BEED) जिल्हा एकेकाळी स्त्री भ्रूण हत्येसाठी गाजला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता देखील बीड जिल्ह्यातील अस्थिरतेचे वातावरण आहे. सामाजिक सलोखा सावरण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून या रॅलीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी दिली.
पुरोगामी महाराष्ट्रातील आजचे चित्र खूपच वाईट आहे. सामाजिक जातीभेद बाजूला ठेवून, समाजवादाच्या दृष्टीकोनाचा वारसा फक्त काँग्रेसकडेच आहे. बीड जिल्ह्यात या माणसांकडे जायचे नाही. त्याच्याकडे जायचे नाही. इथं किराणा भरायचा नाही, असे वातावरण आहे. बीडमध्ये माणसांमध्ये माणूस नाही. जातीय विष पेरलं गेले आहे. हेच रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्षन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही सद्भावना रॅली काढली जात आहे.
सांगवी सारणी, यळ्ळमघाट, नांदूर फाटा मार्गे पुढे जाईल. यळ्ळमघाट इथं दुपारी जेवणाची सोय असेल. तिथं स्थानिक लोकांशी संवाद साधला जाणार आहे. बिगर राजकीय संवाद असेल. 50 टाळकरी, भजनकरी यांचा सहभाग असेल, भजन म्हणत ही रॅली पुढे सरकेल. ही यात्रा पुढे व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या सद्भावना रॅलीत बीड जिल्ह्यातील सामाजिक संघटना, डाॅक्टर, अभियंता, वकील संघटना, विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले. मस्साजोगमधून रॅली सुरू होताना पहिल्या टप्प्यात साडेसातशे लोक सहभागी होती. महिला दिन असताना, सामाजिक काम करणाऱ्या महिलांचा समावेश असेल, पहिल्या दिवशी 21 किलोमीटर रॅली चालणार आहोत, असेही सोनवणे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.