Massajog Sarpanch Election : स्वरुपानंद देशमुखांच्या गुलाल उधळून जल्लोषावर संतोष देशमुखांच्या आई नाराज; भेटीला येताच व्यक्त केली खंत!

beed sarpanch bypoll result Politics News : नुकत्याच झालेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला.
swarupanand deshmukh win ashwini deshmukh reaction
swarupanand deshmukh win ashwini deshmukh reactionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झालेल्या पोट निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झाले.

  2. विजयानंतर त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली असता संतोष देशमुख यांच्या आईने तीव्र नाराजी व्यक्त केली.

  3. विजय साजरा करण्यावरून भावनिक वातावरण निर्माण झाले आणि हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला.

Beed News : दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच्या पोट निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला. 92 मतांनी निवडून आल्यानंतर स्वरुपानंद देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत विजयी जल्लोष केला. दरम्यान, स्वरुपानंद देशमुख यांनी देशमुख कुटुंबाचे घर गाठत संतोष देशमुख यांच्या आई व पत्नी अश्विनी देशमुख यांची भेट घेतली.

यावेळी गुलालाने माखलेल्या स्वरुपानंद देशमुख यांच्याकडे संतोष देशमुख यांच्या आईने तीव्र नाराजी व्यक्त केली. अश्विनी देशमुख यांना बहीण म्हणणाऱ्या स्वरुपानंद देशमुख यांना 'तुझी बहीण होती ना ती, दुसऱ्या कोणाचं असं झालं असतं तर गुलाल उधळला असता का?' असा सवाल करत सुनावले.

यावर स्वरूपानंद यांनी 'माझा काही विलाज नव्हता, असे उत्तर दिले. त्यावर पुन्हा संतोष देशमुख यांच्या आईने विलाज कसा नव्हता? तुझी बहीण होती ना ती, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मात्र स्वरुपानंद देशमुख यांनी तिथून काढता पाय घेतला. बाहेर पडल्यानंतर संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत स्वरुपानंद यांनी तिथे उपस्थित धनंजय देशमुख यांच्याशी मोजका संवाद साधला.

swarupanand deshmukh win ashwini deshmukh reaction
Massajog Sarpanch Election Result News : मस्साजोगमध्ये बाहेरचा राजकीय हस्तक्षेप वाढला, अन् मतदारांनी भाकरी फिरवली!

चांगले काम करा आम्ही सोबत राहू, असा शब्द धनंजय देशमुख यांनी दिला तर 'संतोष आण्णाच आम्ही स्वप्न पूर्ण करू' असा शब्द स्वरुपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना दिला आणि ते निघून गेले. दरम्यान, राजकारण संपले आता गावाच्या विकासासाठी काम करणार असे स्पष्ट करतानाच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात आम्ही कायम या कुटुंबाच्या पाठीशी राहू, असेही स्वरुपानंद देशमुख यांनी सांगीतले.

swarupanand deshmukh win ashwini deshmukh reaction
Beed Massajog Sarpanch Election : संतोष देशमुखांच्या लढाईत खंबीर उभा होतो, पुढेही राहणार! सरपंच स्वरूपानंद देशमुखांचा विजयानंतर दमदार इशारा

FAQs :

1. पोट निवडणुकीत कोण विजयी झाले?
स्वरुपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झाले.

2. या निवडणुकीचा संदर्भ काय आहे?
ही निवडणूक दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झाली.

3. विजयानंतर काय घडले?
स्वरुपानंद देशमुख यांनी कुटुंबाची भेट घेतली, तेव्हा संतोष देशमुख यांच्या आईने नाराजी व्यक्त केली.

4. आईने काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी विजयाच्या जल्लोषावर प्रश्न उपस्थित करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

5. हा प्रसंग का चर्चेत आहे?
भावनिक वातावरण आणि कुटुंबाच्या प्रतिक्रियेमुळे हा प्रसंग मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com