Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाहीच; काशिद यांचा मृतदेह अंबाजोगाईच्या चौकात मांडून आंदोलन

Beed Maratha Reservation : शत्रुघ्न काशिद यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली.
Maratha Reservation :
Maratha Reservation :Sarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : मराठा आरक्षणाची मागणी करत पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करून नंतर उडी मारून आत्महत्या केलेल्या शत्रुघ्न काशिद यांचा मृतदेह अंबाजोगाईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.

मराठा आरक्षण देण्याची मागणी करत अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न अनुरथ काशीद (वय ४३, रा. गिरवली) हे शुक्रवारी रात्री गावातील पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढले. त्यांनी काही काळ या ठिकाणी आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली.

Maratha Reservation :
Haribhau Bagde News : निवडणूक लढवणार नाही म्हणणाऱ्या हरिभाऊंशिवाय भाजपला पर्याय दिसेना; इच्छुकांच्या आशेवर फेरलं पाणी?

घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्न काशिद यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. दरम्यान, शनिवारी त्यांचा मृतदेह अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणून ठेवला आहे. जोपर्यंत आरक्षण मंजूर होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार नाहीत, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे. समाज बांधव मोठ्या प्रमाणावर जमले असून, या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान, इकडे बीडमध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे यांची समिती दाखल झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात झालेल्या लाठीमारानंतर राज्यातील वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे,पण दुसरीकडे तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याने या आंदोलनाला गालबोटही लागत आहे. दिवसेंदिवस तरुणांच्या आत्महत्येच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Maratha Reservation :
Administration : चंद्रपुरात तत्परतेने राबताहेत विनय गौडा; संपूर्ण प्रशासनाचा होतोय ‘सिना चौडा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com