बीड : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर होते. काल त्यांनी परळी वैजनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेत जलाभिषेक केला. (Beed) तर आज गोपीनथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती स्थळाचे देखील दर्शन घेतले.
गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते, वैचारिक मतभेद असले तरी अनेक लोक त्यांच्यावर मनापासून प्रेम करायचे. लोकशाहीत हेच अपेक्षित असते. (Gopinath Munde) गोपीनाथ मुंडे आणि मी सोबत काम केलेले आहे, आज त्यांच्या स्मृती स्थळावर येऊन दर्शन घेण्याचे मला भाग्य लाभले. मी त्यांना श्रद्धापूर्वक नमन करतो, अशी प्रतिक्रिया राज्यपाल कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी दिली.
तत्पुर्वी त्यांनी परळीतील प्रभू वैद्यनाथाचे व अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शनही घेतले. श्रावण महिना असल्यामुळे राज्यपालांनी परळी येथे येऊन वैजनाथाचे दर्शन घेतले. गोपीनथ गडाला त्यांनी दिलेली भेट आणि मुंडे यांच्या स्मृती स्थळाचे घेतलेले दर्शन याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
राज्यपालांच्या या अनपेक्षित भेटीने मुंडे समर्थक भारावून गेले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी कोश्यारी यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना ते माझे सहकारी होते याचा आवर्जून उल्लेख केला. ते लोकनेते होते, लोक त्यांच्यावर मनापासून प्रेम करायचे हे सांगतांना ते माझे सहकारी होते हे सांगायला देखील कोश्यारी विसरले नाहीत.
राज्यातील राजकीय परिस्थिती त्यात स्व.गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याची त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली नाराजी पाहता राज्यपालांच्या या दौऱ्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. गोपीनाथ गडाला राज्यपालांनी दिलेली भेट पंकजा मुंडे यांची भावी राजकीय वाटचाल सुकर करणारा ठरेल का? अशी चर्चा देखील या निमित्ताने होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.