Beed : नव्या राजकीय बांधणीत पंकजा मुंडेंवर कोणता भार

गेल्या आठवड्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यात आलेल्या पंकजा मुंडे यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करुन मुंबई गाठली आहे. (Pankaja Munde)
Pankaja Munde News, Beed Latest Marathi News, Maharashtra Political  News Updates
Pankaja Munde News, Beed Latest Marathi News, Maharashtra Political News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

बीड : राज्याच्या राजकारणात सध्या राजकिय उलथापालथी गतीमान झाल्या आहेत. शिवसेनेतील बंडानंतर प्रथमच आता भाजप मैदानात आले आहे. (Beed) राज्यात नवे राजकीय समिकरण अस्तित्वात आणण्याचे भाजपचे टोकाचे प्रयत्न सुरु आहेत. नवी बांधणी झालीच तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर कोणता भार असेल, याविषयी आतापासूनच अंदाज बांधले जात आहेत.(Beed Latest Marathi News)

पंकजा मुंडे या भाजपमधील प्रमुख ओबीसी मास लिडर मानल्या जातात. २०१४ मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. याचा भाजपला (Bjp) निवडणुकीत मोठा फायदाही झाला. यामुळे राज्यातील राजकारणात व विशेष: भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचे स्थान अधोरेखित झाले.

निकालानंतर त्यांना मंत्रीमंडळात महत्वाच्या पदांसह त्यांना कोअर कमिटीतही पहिल्या रांगेत स्थान भेटले. मात्र, काही काळातनंतर त्यांच्यात व तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीशी ओढाताण सुरु झाली. याच काळात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या विनायक मेटे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिले जाणारे बळ हा मुद्दा देखील ओढाताणीचे कारण होता.

विनायक मेटे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यावेळच्या पाच पैकी भाजपचा एकही आमदार नव्हता हे विशेष. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या निवडणुकपूर्व संकल्प यात्रेत विनायक मेटे यांना अधिक स्पेस दिल्या कारणाने पंकजा मुंडे कार्यक्रम सोडून थेट शासकीय विश्रामगृहात निघूनही आल्या होत्या.

परळीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवाला फडणवीसांची मदत असल्याचा आरोपही त्यांचे समर्थक करत असतात. निकालानंतर त्यांनी कोअर कमिटीतून बाहेर पडून लोकांमध्ये जाऊन काम करण्याचे जाहीर केले होते. गोपीनाथ गड व भगवान भक्तीगडांवर झालेल्या मेळाव्यांत पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक मते मांडली आहेत.

आपल्याला पदापेक्षा लोकांसाठी काम करण्यात रस असल्याचे त्यांनी वारंवार सांगीतले. दरम्यान, त्यांना भाजपने मध्यप्रदेशचे सहप्रभारीपद व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपद दिले. मधल्या काळात विधान परिषदेत वा राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना संधी मिळेल, अशी समर्थकांची अपेक्षा होती. आगामी जिल्हा परिषद - पंचायत समित्या व नगर पालिका निवडणुकांमध्ये पक्षाला पंकजा मुंडे यांची मोठी मदत होईल म्हणून त्यांना संधी मिळेल, असे गणित मांडले जात होते.

Pankaja Munde News, Beed Latest Marathi News, Maharashtra Political  News Updates
मराठवाड्यातील काही बंडखोर सेनानेत्यांची राजकीय कारकिर्द संपू शकते...

त्यातही त्यांचे नाव टळल्याने त्यांच्या समर्थकांमधून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला. आता राज्यात मोठ्या राजकीय उलथापलथी होत आहेत. गेल्या आठवड्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यात आलेल्या पंकजा मुंडे यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करुन मुंबई गाठली आहे. आता घडामोडींना वेग येत आहे.

परवा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला त्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसोबत हजर राहील्या. त्यामुळे राज्यात राजकिय समिकरणे बदलली तर पंकजा मुंडे यांना निश्चित स्थान मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना खात्री वाटत आहे. या घडमोडीत आतापर्यंत पडद्याआड असलेले भाजप मंगळवारच्या रात्रीपासून मैदानात उतरले आहे.

राज्यपालांना भेटून सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडण्याची भाजपने केलेली मागणीही मान्य झाली आहे. त्यामुळे राज्यात निश्चित राजकीय बदल घडेल, अशी भाजप समर्थकांची खात्री आहे. या बदलात पंकजा मुंडे यांच्यावरही जबाबदारी असेल असे त्यांच्या समर्थकांना वाटत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com