
Beed ZP employee news : बीडमधील सरपंच देशमुख हत्येचे प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणातील प्रमुख संशयित सूत्रधार वाल्मिक कराड अन् त्याच्या टोळीविरोधात खटला सुरू आहे. परंतु वाल्मिक आकाचे समर्थक बीडमध्ये 'कोने कोने में फैले है', त्यांच्या डोक्यात वाल्मिक कराड येतच असतो. आता देखील असाच प्रकार घडला आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या मोबाईलमधील व्हाॅट्सअॅपला वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी आरोपीचे समर्थन करणारे बॅनर लावू नयेत किंवा त्यांचे समर्थन होईल, असे कृत्य करू नये, अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी कालिदास सानप याने रात्री स्वतःच्या व्हाटस्अप स्टेटसला वाल्मिक कराडचे पोस्टर ठेवले. यावर 'शेवटी विषय आमच्या काळजाचा आहे WE SUPPORT WALMIK ANNA', असा मजकूर होता. वाल्मिक कराड याच्याबरोबर मुंडे कुटुंबातील सर्व राजकीय सदस्यांचे आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासमवेत असलेला फोटो देखील स्टेटस शेअर केला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित सूत्रधार वाल्मिक कराड याच्या समर्थनाथ सरकारी कर्मचाऱ्याने स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच बीडमधील (BEED) जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीचे समर्थन करणारे बॅनर लावू नयेत किंवा त्यांचे समर्थन होईल, असे कृत्य करू नये अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत.
पण, जिल्हाधिकाऱ्यांचे या सूचनांचे पालन होताना दिसत आहे. आता तर त्यांच्या सूचनांचे पालन सरकारी कर्मचाऱ्याने न केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला एकप्रकारे केराची टोपली दाखवली आहे. वाल्मिक कराडा याच्या समर्थनार्थ पोस्टर ठेवल्याने बीड जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांचे कारनामे चर्चेत आले आहेत. तसंचे त्याचे राजकीय संबंधाची देखील चर्चा सुरू आहे. हा कर्मचारी सर्वाधिक काळ राजकीय नेत्यांबरोबर कसा असतो, यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाने बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची किती दहशत होती, हे पोलिस तपासात वेळोवेळी समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि मुंडे परिवाराशी वाल्मिक कराड याचे राजकीय आणि छुपे व्यवहारीक संबंध उघडकीस आले. याच राजकीय वरदहस्तामुळे त्याने स्वतःचे साम्राज्य उभे केले. यातून त्याने अवैध धंद्याचे साम्राज्य उभं केल्याचं समोर आलं.
बीडच्या गुन्हेगारीत सुसाट सुटलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर ब्रेक लागला. यातूनच पुढे महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांची देखील अडचण झाली. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचे जाहीर केलेलं आहे.
संतोष देशमुख हत्येचा खटला सुरू आहे. तारखांवर-तारखा सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून देखील समर्थकांची वाल्मिक कराडविषयी बॅनरबाजी, सोशल मीडियावर पोस्ट शेअरींग सुरूच आहे. आता तर सरकारी सेवेतील कर्मचाऱ्याने वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. 'आका'चे समर्थक कुठ-कुठपर्यंत पोहोचले आहे, याची प्रचिती यानिमित्ताने येऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.