Beed Palak Mantri: बीडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे येणार; अजित पवारांची ग्वाही, धनंजय मुंडेंची लागणार वर्णी

Ajit Pawar News : बीडचे पालकमंत्रिपद पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे येणार, हे निश्चित आहे.
Ajit Pawar - Dhananjay Munde
Ajit Pawar - Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News: बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच देण्याचे काम लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बीडमधून धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, त्यामुळे बीडचे पालकमंत्रिपद पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे येणार, हे निश्चित आहे. (Beed's guardianship will go to NCP; Testimony of Ajit Pawar)

बीडमधील सभेत बोलताना अर्थमंत्री पवार यांनी तसे स्पष्टपणे म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, मी आणि सुनील तटकरे आता बोलत होतो की, बीडचे पालकमंत्रिपदही लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्यात येईल. सगळ्या जिल्ह्यांना आणि सगळ्या सहकाऱ्यांना न्याय कसा मिळेल, याकडे विशेष लक्ष दिले जाईल.

Ajit Pawar - Dhananjay Munde
Madha Loksabha : पुन्हा दोस्ताना; संजय शिंदेंचा खासदारकीसाठी निंबाळकरांना पाठिंबा, अधिक मतांनी निवडून आणण्याचा निर्धार

दरम्यान, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी बीडचे पालकमंत्रिपद हे धनंजय मुंडे यांच्याकडेच होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सव्वा वर्षापासून बीडचे पालकमंत्रिपद हे रिक्त आहे. त्यामुळे बीडचे पालकत्व हे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे येणार, हे जवळपास निश्चित आहे.

आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या भाजप-शिवसेनेसोबत युती करून लढवायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय घ्यायचा, ते आपण ठरवू. पण, केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार, तर राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, असेही पवार यांनी नमूद केले.

Ajit Pawar - Dhananjay Munde
Ajit Pawar Beed Sabha : धनुभाऊ, बीडमध्ये तुम्ही लावलेल्या दिव्याचा उजेड पडला नाही; मात्र आम्हाला चटके बसले : क्षीरसागरांची खंत

अजित पवार म्हणाले की, इतर लोक काय म्हणतात, त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देत मी वेळ घालवणार नाही. आपल्याला काम करायचे आहे, विकास करायचा आहे. या कारणासाठीच आपण महायुती सरकारसोबत गेलेलो आहे. ही गोष्ट मराठवाडा आणि बीडच्या जनतेने लक्षात ठेवावी. आमचा दुसरा कोणताही स्वार्थ नाही. कुठलाही स्वार्थ नाही. काहीजण कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तव्ये करतात. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, त्यात तसूभरसुद्धा तथ्य नाही, ही बाब तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com