Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकलं; 'या' घटकांना शपथ केली अर्पण

Beed MP Bajrang Sonwane Takes Oath : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संसदेत पोहोचलेल्या बजरंग सोनवणेंनी यांनी मंगळवारी लोकसभा सदस्यत्वाची मराठीतून शपथ घेतली.
Bajrang Sonwane
Bajrang SonwaneSarkarnama

Beed News, 25 June : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करुन संसदेत पोहोचलेल्या बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी मंगळवारी (ता. 25 जून) रोजी लोकसभा सदस्यत्वाची मराठीतून शपथ घेतली.

तत्पुर्वी त्यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवत हात जोडले. तुम्हा सर्वांना आणि त्या मातृभूमीला स्मरून ही शपथ घेतली. श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमच्यासाठी लढत राहील. तुमच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करीन. माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कष्टकरी, गोरगरीब, कामगारांना, महिला, युवांना आजची ही शपथ अर्पण करतो, अशी भावना बरजंग सोनवणे यावेळी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. मागच्या निवडणुकीत सोनवणे यांचा डॉ. प्रितम मुंडे यांनी एक लाख 68 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. या निवडणुकीपूर्वी बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करुन निवडणूक लढवली. त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर साडे सहा हजार मतांनी विजय मिळविला.

निकालाच्या 21 व्या दिवशी मंगळवारी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. संसदेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी नव्या संसद भवनाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवत हात जोडले. त्यांच्या शपथविधीसाठी त्यांच्या पत्नी सारिका सोनवणे तसेच तीन मुले आणि निवडक समर्थक हजर होते. बजरंग सोनवणे यांनी मराठीतून शपथ घेतली.

Bajrang Sonwane
Suryakanta Patil Join NCP : आधी केसाने गळा कापल्याचा आरोप, आता शरद पवारांच्या नेतृत्वावरच विश्वास...

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने बीड (Beed) जिल्ह्याचा खासदार म्हणून निवड झाली. आज तो महत्वाचा क्षण आला, मी खासदार म्हणून शपथ घेतली. ती घेताना तुम्हा बीड जिल्ह्यातील सर्वांची आठवण मनात होती. इथली माती माझ्या स्मृतीत होती. तुम्हा सर्वांना आणि त्या मातृभूमीला स्मरून ही शपथ घेतली.

Bajrang Sonwane
Sandeep Jagtap: "पैशाचं सोंग करता येत नाही..., असं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमच्यासाठी लढत राहील. तुमच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करीन. माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कष्टकरी, गोरगरीब, कामगारांना, महिला, युवांना आजची ही शपथ अर्पण करतो, अशी भावना बरजंग सोनवणे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com