Nanded Political News : वसंतराव चव्हाण यांच्याआधी खेडकर, अंतापूरकरांसह अनेक लोकप्रतिनिधींची झाली होती अचानक एक्झीट

Before Vasantrao Chavan, there was a sudden exit of many people's representatives : 46 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचा शेवट खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. वंसतराव चव्हाण यांचे हे अचानक जाणे नांदेड आणि मराठवाड्यातील जनतेच्या मनाला चटका लावणारे ठरले. नांदेड जिल्ह्यातील जनतेला असे प्रसंग नवे नाहीत.
vasant chavan
vasant chavansarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : राजकारण हे क्षेत्र धकाधकीचे, धावपळीचे आणि प्रचंड तणावाचे आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. काहीजण झटपट श्रीमंत होण्याचा शार्टकट म्हणून राजकारणाकडे पाहतात. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो, पण राजकारण, समाजकारण करतांना अनेकदा वाईट प्रसंग, दुखःद घटनांनाही तोंड द्यावे लागते.

नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या राजकारणावर एक नजर टाकली तर जनतेने निवडून दिलेल्या अनेक लोकप्रतिनिधींना ते पदावर असतांना अकाली एक्झीट घ्यावी लागली. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघातून ऐतिहासिक मिळवला होता. ज्या राजकीय परिस्थितीत त्यांनी हा विजय मिळवला त्याचे जिल्ह्याच्य राजकारणात आणि काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने विशेष महत्व होते.

पण 46 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचा शेवट खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. वंसतराव चव्हाण यांचे हे अचानक जाणे नांदेड आणि मराठवाड्यातील जनतेच्या मनाला चटका लावणारे ठरले. नांदेड जिल्ह्यातील जनतेला असे प्रसंग नवे नाहीत. यापुर्वी पदावर असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींवर काळाने असा अचानक घाला घातल्याची उदाहरणे आहेत.

vasant chavan
Vasant Chavan : सरपंच ते खासदार, वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

यात मुखेडचे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे, भोकरचे माजी आमदार बाबासाहेब गोरठेकर, किनवटचे सुभाष जाधव, नांदेडचे प्रकाश खेडकर, मुखेडमधून विधानसभेवर निवडून गेलेले गोविंद राठोड, देगलूरचे रावसाहेब अंतापूरकर यांचाही समावेश आहे. (Marathwada) जनतेने भरभरून प्रेम दिलेल्या या लोकप्रतिनिधींच्या अकाली जाण्याने त्या त्या काळात जिल्ह्यात मोठी राजकी पोकळी निर्माण झाली.

ही पोकळी भरुन काढण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांच्या वारसांना किंवा निष्ठावान कार्यकर्त्यांना पोटनिवडणुकीत संधी दिली. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर सहाजिकच या जुन्या पण कटु आठवणी समोर आल्याशिवाय राहत नाहीत. 1992 मध्ये किनवटचे आमदार सुभाष जाधव यांचे एका अपघातात निधन झाले होते. त्यानंतर 1990-95 दरम्यान मुखेडचे आमदार मधुकरराव घाटे यांचे 94 मध्ये आकस्मिक निधन झाले होते.

vasant chavan
Vasant Chavan : ग्रामपंचायत ते लोकसभा, पक्ष अडचणीत असताना 'शिवधनुष्य' पेलणारे वसंत चव्हाण यांचा असा आहे राजकीय प्रवास...

या दुखःद घटनांचा प्रवास 2003 मध्ये नांदेडचे शिवसेना आमदार प्रमोद खेडकर यांच्या निधनामुळे सुरूच होता. अनंत चतुर्थीच्या म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशीच मिरवणुकीतच प्रमोद खेडकर यांना अचानक मृत्यूने गाठले होते. त्यानंतर काही काळातच भोकरचे तत्कालीन आमदार बाबासाहेब गोरठेकर हे आमदार असताना दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली होती. 2014 मध्ये मुखेड विधानसभा मतदारसंघात गोविंद राठोड हे भाजपाच्या तिकीटावर आमदार झाले होते. पण आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच नांदेड-मुंबई रेल्वे प्रवासात त्यांचा अचनाक मृत्यू झाला.

त्यानंतर पक्षाने त्यांचे पुत्र डॉ. तुषार राठोड यांना उमेदवारी देत निवडून आणले होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देगलूरमधून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रावासाहेब अंतापूरकर दोन वर्षांनी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना महामारीचे शिकार बनले. 2021 मध्ये कोरोना संसर्ग झाला आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पुढे तत्कालीन काँग्रसचे नेते अशोक चव्हाण यांनी रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि निवडून आणले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com