नायगांव/नांदेड : काँग्रेसचे नेते आणि मी महाराष्ट्राचा आवाज ऐकत चालतोय. शेतकरी, युवा, आया बहिणींशी बोलतोय. आम्ही शांत राहतो त्यांचं ऐकतो, खूप काही शिकता येतं त्यांच्याकडून. गाडी वर चालणे आणि रस्त्यावर चालणे वेगळं आहे. देशाला समजुन घ्यायचं असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. सगळ्यात अगोदर रस्ते कळतात, खड्डे आहेत, की चांगले आहेत हे कळते, अशा शब्दात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृष्णूर एमआयडीसी येथील काॅर्नर सभेत उपस्थितांशी संवाद साधला. विमान उडावे, तसे प्रकल्प देखील गुजरातेत जात आहेत,असा टोला देखील त्यांनी लगावला.
तरुण आपल्या भविष्याबद्दल, शिक्षणाबाबद्दल सांगतो, शेतकऱ्यांशी छोट्या व्यपाऱ्यांशी बोललो की दुःख होते. (Congress) नोट बंदीचा परिणाम सहा वर्षांपासून दिसतो, जशी सुनामी येते आणि तिचा परिणाम अनेक वर्षानंतर दिसतो, तेच आज दिसते आहे, असा टोला देखील (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी लगावला.
भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातला तिसरा दिवस होता. कृष्णूर एमआयडीसीमधील काॅर्नर सभेने आजच्या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि त्यांच्या ध्येय धोरणांवर कडाडून हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले, विमान जसे उडते, तसा एअर बसचा प्रकल्प उडून गुजरातला गेला. का गेला, तर गुजरातमध्ये निवडणुका आहेत. प्रकल्प गेला, पैशाचे सोडा, पण युवकांचा रोजगार हिसकावला जात असल्याचे ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.