Bharat Jodo : द्वेशाला प्रेमाने उत्तर देण्यासाठी 'भारत जोडो' ,महाराष्ट्रात पदयात्रेचा पहिला दिवस

यात्रा मार्गावर केळी, सफरचंद, बाटलीबंद पाणी याचे नियोजन केले होते. टाकळी येथे भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. दुपारच्या विश्रांती स्थळीही उत्साह दिसून आला. ( Bharat Jodo)
Bharat Jodo Rally In Nanded News
Bharat Jodo Rally In Nanded NewsSarkarnama
Published on
Updated on

देगलूर : राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा मंगळवारी (ता. आठ) महाराष्ट्रात पहिला दिवस होता. सकाळी नऊ वाजता हजारोंच्या उपस्थितीत राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी तालुक्यातील वन्नळी येथून गुरुद्वारापासून चालायला सुरुवात केली. हातात कॉंग्रेसचे झेंडे, अंगात पांढरे टी शर्ट घालून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक यांनी यात्रेत सहभाग घेतला.

Bharat Jodo Rally In Nanded News
Shivsena : शिंदे गटावर तुटून पडणारे आदित्य ठाकरे फडणवीसांच्या बाबतीत मवाळ ?

द्वेशाला प्रेमाने उत्तर देण्यासाठी आम्ही आलोत, असे जो तो सांगत होता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच‌ वयोगटातील महिला, पुरुष यात सहभागी होते. (Rahul Gandhi) पदयात्रा सुरू होण्याची वेळ सकाळी साडेसातची होती. (Congress) त्या अनुषंगाने सर्वच कार्यकर्ते, नागरिक यांनी सातपासूनच जमायला सुरुवात केली होती.

वातावरण निर्मितीसाठी शाहिरी पथक क्रांतिगीतांचे गायन करत होते.‌ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनीही सकाळी गीतगायनात भाग घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. या पदयात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.

त्यासाठी यात्रा मार्गावर केळी, सफरचंद, बाटलीबंद पाणी याचे नियोजन केले होते. टाकळी येथे भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. दुपारच्या विश्रांती स्थळीही उत्साह दिसून आला. सकाळी दहाच्या दरम्यान तिथे राहुल गांधी आणि त्यांच्या सोबत असलेल्यांना नाश्ता दिला गेला.

नंतर दोन तासांनी जेवण दिले. जेवणामध्ये गोड पदार्थ,आईस्क्रीमही होते. जेवणानंतर कुणाला डुलकी लागली तर कुणी रिल बनवल्या. काही जण गप्पा करीत होते. विश्रांती घेऊन दुपारी तीनसाडेतीन वाजता यात्रेकरू पुन्हा चालायला लागले.

Bharat Jodo Rally In Nanded News
सुषमा अंधारे दहशतवादी आहेत काय?

यात्रेतील क्षणचित्रे

-राहुल गांधी यांच्याअगोदर कॉंग्रेसचे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावरील नेते यात्रेच्या आरंभ ठिकाणावर

-८.१७ वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यात्रा ठिकाणी

-८.३० वाजता दिग्विजय सिंह व जयराम रमेश यात्रा स्थळी

-८.३८ कन्हैया कुमार यांचे आगमन

-योगेंद्र यादवांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com