Shivsena : शिंदे गटावर तुटून पडणारे आदित्य ठाकरे फडणवीसांच्या बाबतीत मवाळ ?

भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करण्याचे आदित्य यांनी टाळल्याचे दिसून आले. (Aditya Thackeray)
Aditya Tahckeray-Devendra Fadanvis News, Aurangabad
Aditya Tahckeray-Devendra Fadanvis News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : वेंदाता, फाॅक्सकाॅन, टाटा एअरबससह दोन लाख तरुणांच्या हाताचा रोजगार देणारे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर तर आदित्य यांनी फडणवीसांना सडेतोड उत्तर देत त्यांचे दावे, आरोप खोडून काढले होते. खोके सरकार, खोटे सरकार असा हल्ला चढवत थेट फडणवीसांना भिडणारे आदित्य ठाकरे सध्या मात्र त्यांच्याबद्दल फारच मवाळ झाल्याचे दिसून आले.

Aditya Tahckeray-Devendra Fadanvis News, Aurangabad
अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा; अन्यथा.... : राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी आक्रमक

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते शिवसंवाद मेळावे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा करतांना दिसत आहेत. (Devendra Fadanvis) काल अकोला आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आदित्य ठाकरे होते. या दोन्ही ठिकाणी केलेल्या भाषणात ठाकरे यांनी शिंदे गटाताली आमदार, मंत्री यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर गद्दार, खोके अशी टीका करत राजीनामे देवून निवडणुकीला सामोर जाण्याचे आव्हान दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्र्यांचा घटनाबाह्य मुख्यमंत्री, सरकार आणि मंत्री असा उल्लेख करत शिंदे गटावर ठाकरे अक्षरशः तुटून पडले होते. हे करत असतांना भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करण्याचे आदित्य यांनी टाळल्याचे दिसून आले. उलट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सारख्या वाचाळ मंत्र्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिमा मलिन होत आहे, ते सत्तारांचा राजीनामा घेणार की नाही? आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही, पण उपमुख्यमंत्री हे कसे खपवून घेतात? असा उल्लेख केला.

यातून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न देखील आदित्य ठाकरे यांनी केल्याचे दिसून येते. एक म्हणजे राज्यातील सत्तेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काहीच चालत नाही, त्यांना कुठलेच अधिकार नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. तर धमक्या, मारझोड, कानाखाली आवाज काढण्याची भाषा, गोळीबार आणि महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मंत्र्यांमुळे भाजपची प्रतिमा कशी मलिन होत आहे हे भासवत फडणवीसांना कारवाई करण्यास भाग पाडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला.

शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांच्या वागणुकीबद्दल फडणवीस हे नाराज असल्याचे वारंवार समोर आलेले आहे. त्यात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे फडणवीसांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे फडणवीसांना याबाबत वारंवार विचारणा करत कारवाई करायला प्रवृत्त करत शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न देखील आदित्य ठाकरे करतांना दिसत आहेत. अकोला येथील सभेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा उल्लेख करत आपण उपमुख्यमंत्री असतो तर हे खपवून घेतले नसते, फडणवीसांना हे चालते का? मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नाही, हे त्यांचे विधान बरेच काही सांगून जाणारे आहे.

Aditya Tahckeray-Devendra Fadanvis News, Aurangabad
Shivsena : अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा या परस्पर विरोधी गोष्टी..

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात देखील आदित्य ठाकरे यांचे फडणवीस आणि भाजपबद्दलचे मवाळ धोरण पहायला मिळाले. सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या भाजप पदाधिकाऱ्यांमुळे किमान सत्तारांना विधानसभा निवडणुकीत लढत देणे तरी शक्य होते. पडद्यामागचे राजकारण झाले नाही, तर भाजपकडून याआधीच सत्तारांचा पराभव झाला असता हे देखील तितकेच खरे.

त्यामुळे सिल्लोडमध्ये जाऊन सत्तारांना अंतर्गत तीव्र विरोध असलेल्या भाजपला दुखावणे आदित्य ठाकरे यांनी टाळले. या उलट राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल घाणेरडी भाषा वापरत केलेली शिवीगाळ हा मुद्दा नेटाने पुढे करत आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांऐवजी थेट उपमुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरूंग लावत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात ज्यांची महत्वाची भूमिका होती, त्या फडणवीसांवरचा ठाकरेंचा राग शांत झाला की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com