Bharat Jodo Yatra ..तुमचाच आवाज त्याच्या तोंडून निघायचा : राहुल गांधी सातवांच्या आठवणीत भावूक!

Bharat Jodo Yatra : तो आपलं वैयक्तिक बाबी कधी बोललाच नाही. आज आनंद आहे की, त्यांची पत्नी भारत जोडो पदयात्रेत दिवसभर सोबत चालली.
Rajiv Satav
Rajiv SatavSarkarnama

हिंगोली : काँग्रेसचे प्रमुख नेते व खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचं आता महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे. तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यात यात्रेचा मुक्काम होता. आज राज्यात यात्रेच्या सहाव्या दिवशी हिंगोली येथे राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी त्यांचे एकेकाळचे सहकारी व हिंगोलीचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्याआठवणीत राहुल गांधी भावूक झाले.

राजीव सातव हे आपल्यात नाही. याचे दु:ख वाटते, यासाठी की, तो मित्र होता, त्यापेक्षा तो काम अधिक म्हणजे तो चांगला करत होता. माझी त्याची जेव्हा भेट व्हायची तेव्हा तुमचाच आवाज त्याच्या तोंडून निघायचा. तो आपलं वैयक्तिक बाबी कधी बोललाच नाही. आज आनंद आहे की, त्यांची पत्नी भारत जोडो पदयात्रेत दिवसभर सोबत चालली, अशा शब्दात राहुल गांधींनी सातवांच्या आठवणींना उजाळा दिला.

Rajiv Satav
राजीव सातव यांचे शासकीय रुग्णालयाचे स्वप्न पुर्ण करणार..

समाजात हिंसा, द्वेष पसरु नये म्हणून ही यात्रा आहे. काही लोक हेलीकॉप्टर ने जातात भाषण करतात, जसे की पंतप्रधान करतात. आम्हाला यात्रेची गरज का पडली. काही दिवसांपूर्वी मी माईक बंद असल्याची गंमत केली. संसदेत जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यावर बोलू दिले जात नाही. म्हणून एकच मार्ग राहिला. लोक जिथं चालतात तिथे आम्ही चालायला लागलो, असेही गांधी म्हणाले.

Rajiv Satav
Pimpari News : हिंदूविषयी वादग्रस्त वक्तव्य : कॉंग्रेस नेत्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन!

बँड पथक, लेझीम पथक, संबळ, सनई वादन, ढोल पथकाच्या वादनात यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षाताई गायकवाड, माणिकराव ठाकरे, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात, प्रज्ञाताई सातव यांच्यासह राज्यपरातून आलेले नेतेमंडळी स्वागतासाठी उपस्थित होती. शिवाय परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com