
Mumbai News : राज्यातील महायुती सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीपासून काहीसे दूर राहताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या बैठकांना अनुपस्थित राहण्याच्या त्यांनी धडका लागवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा वाढल्यात.
भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना जवळ केले आहे.यातच पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचा वाद देखील पेटलेलाच आहे. हे सर्व शिवसेनेच्या वाटचालीवर परिणाम करणाऱ्या असल्याने एकनाथ शिंदेंची महायुतीमधील दिवसेंदिवस नाराजी वाढली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जिल्हानिहाय बैठका घेत आहेत. या बैठका पालकमंत्र्यांच्या उपस्थित घेतल्या जात आहे. अजितदादांनी काल कोकण आणि नाशिक विभागाची बैठक घेतली. नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी पालकमंत्री नसल्याने बैठका झाल्या नाहीत.
शिवसेना (Shivsena) नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु उपमुख्यमंत्री शिंदे बैठकांना उपस्थित राहू शकणार नाही, असा निरोप आल्याने या दोन्ही जिल्ह्यांच्या बैठका अर्थमंत्री अजितदादांनी पुढे ढकलल्या.
एकनाथ शिंदे बैठकाला का येऊ शकले नाही, याचे कारण समोर आले नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते महायुतीच्या अनेक बैठकांकडे पाठ फिरवत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते अनुपस्थित होते. गेल्या आठवड्यात ते वाॅर रूमच्या बैठकीला देखील नव्हते. शिंदेची महायुतीमधील नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीवर देखील संधी देण्यात आलेली नाही.
रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून वाद आहे. रायगड जिल्ह्यासाठी मंत्री आदिती तटकरे अन् नाशिक जिल्ह्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीनंतर स्थगिती देण्यात आली आहे.
या दोन्ही जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने त्या जागेवर विभागीय आयुक्त नेतृत्व करू शकतात. त्यामुळे आज मंगळवारी होणाऱ्या रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या बैठकांचे नेतृत्व विभागीय आयुक्त करतील, असे सांगण्यात आले. मुंबई शहर, ठाणे आणि आहिल्यानगर जिल्ह्यासाठी देखील आज बैठक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.