MLA Sreejaya Chavan News : भाजप अधिवेशनात भोकर मतदारसंघाचा डंका! सदस्यता नोंदणीत तिसऱ्या क्रमांकावर!

Bhokar constituency ranks third in BJP membership registration : येत्या 20 जानेवारीपर्यंत हा आकडा सत्तर हजारांच्या पुढे घेऊन जात आपल्याला सदस्यता नोंदणीत पहिला क्रमांक पटकवायचा आहे, असे आवाहन श्रीजया चव्हाण यांनी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.
MLA Sreejaya Chavan News
MLA Sreejaya Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : शिर्डी येथे सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनात नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ व त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार श्रीजया चव्हाण यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी कौतुक केले. याचे कारण भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानात आतापर्यंत 41 हजार सदस्यांची नोंदणी करत भोकर मतदारसंघाने महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

येत्या 20 जानेवारीपर्यंत हा आकडा सत्तर हजारांच्या पुढे घेऊन जात आपल्याला सदस्यता नोंदणीत पहिला क्रमांक पटकवायचा आहे, असे आवाहन श्रीजया चव्हाण यांनी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांना भेटण्याची शक्यता आहे. तोपर्यंतच आपण सदस्यता नोंदणीचे उदिष्ट पुर्ण करून राज्यात पहिला क्रमांक मिळवू, असा विश्वास श्रीजया चव्हाण यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला.

MLA Sreejaya Chavan News
Devendra Fadnavis BJP election strategy : अधिवेशन भाजपचे, केंद्रस्थानी CM देवेंद्र फडणवीस यांची 'सबुरी' अन् 'संयम'

वडील अशोक चव्हाण, आजोबा शंकरराव चव्हाण आणि आमच्या कुटुंबाने आतापर्यंत भोकर मतदारसंघासाठी केलेल्या कामाचे हे फळ आहे. मतदार आणि सर्वसामान्यांची मिळत असलेली साथ जोमाने काम करायला ऊर्जा देणारी ठरत असल्याचेही श्रीजया चव्हाण यांनी म्हटले आहे.भाजप सदस्यता नोंदणीत भोकर विधानसभा मतदारसंघाने केलेल्या कामाचे शिर्डी येथील अधिवेशनात पक्षाच्या अनेक नेत्यांनी कौतुक केले.

MLA Sreejaya Chavan News
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांचा नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का! अनेक पदाधिकाऱ्यांची हाती 'कमळ'

हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. याचे संपूर्ण श्रेय मतदारसंघातील नेते, पदाधिकारी व बूथ समित्यांना आहे. कालपर्यंत भोकर मतदारसंघात 41 हजारांहून अधिक सदस्य नोंदणी झाली होती आणि आपण राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होतो. नोंदणीची मुदत आता 20 जानेवारी झाली असून, सर्वांनीच 'घर चलो अभियान' पूर्वीच्याच उत्साहात सुरु ठेवावे, अशी विनंती श्रीजया चव्हाण यांनी केली.

MLA Sreejaya Chavan News
Bhokar Assembly Election Result 2024 आजोबा, वडील, आई अन् मुलगी एकाच मतदारसंघातून विजयी ; चव्हाण कुंटुबियांचा असाही विक्रम

संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्षाची सदस्यता मोहिम सुरु आहे. आपल्याला प्रत्येक बुथवर, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात विशेष जनसंपर्क मोहिम राबवायची आहे. त्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून सदस्य नोंदणी करावी. सर्व नागरिकांनाही माझी विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाचे सदस्य होऊन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासयात्रेला भक्कम पाठिंबा द्यावा,असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मोहिमेच्या सुरूवातीलाच केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com