Ashok Chavan News : अशोक चव्हाणांचा नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का! अनेक पदाधिकाऱ्यांची हाती 'कमळ'

Ashok Chavan's blow to Congress in Nanded, many office bearers join BJP : अशोक चव्हाण, बावनकुळे यांनी या सर्वांचे भारतीय जनता पक्षात स्वागत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला नांदेड जिल्ह्यात शतप्रतिशत यश मिळाले.
Nanded  BJP News
Nanded BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता सत्ताधारी भाजपने तयारी सुरू केली आहे. नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात आणून जोरदार दणका दिला आहे. कालच राष्ट्रवादीचे लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आपल्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने दंड थोपटले.

Nanded  BJP News
BJP Politics : भाजपच प्रदेशाध्यक्ष बदलणार, पण केव्हा? मंत्री बावनकुळेंनी सांगितली निवड प्रक्रिया...

त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला दणका देत अनेकांचे पक्ष प्रवेश करून घेतले. मुंबई येथे (BJP)भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कंधारचे माजी पं.स. सभापती व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, लोहाचे उपनगराध्यक्ष व काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व मारतळाचे सरपंच भास्करराव पाटील ढगे.

Nanded  BJP News
Ashok Chavan On PM Modi News : अशोक चव्हाण म्हणतात, मोदींच्या वचनबद्धतेमुळे मेट्रो नेटवर्क क्षेत्रात क्रांती!

तसेच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील जोमेगावकर, लोहाचे काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष उद्धव पाटील ढेपे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर डाकोरे, कंधार काँग्रेस तालुका उपाध्यक्ष नागोराव पाटील, लोहा-कंधार विधानसभेचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष कमलाकर पाटील शिंदे, लोहा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील ढाकणीकर, शिराढोण सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गोविंद पाटील कपाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Nanded  BJP News
Nanded NCP News : अजितदादांचा नांदेडमध्ये 'डबल धमाका'; भाजप, ठाकरे शिवसेनेतून राष्ट्रवादीत मोठं 'इनकमिंग'

दहीकळंबाचे सरपंच अवधूत पाटील शिंदे, मजूर फेडरेशनचे संचालक गजानन पांडागळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ताराकांत पाटील नरंगलकर यांनीही अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण, बावनकुळे यांनी या सर्वांचे भारतीय जनता पक्षात स्वागत असल्याचे म्हटले आहे.

Nanded  BJP News
BJP Political News : भाजपमध्येही इनकमिंग सुरू, महापालिका स्वबळावर लढण्यावर ठाम!

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला नांदेड जिल्ह्यात शतप्रतिशत यश मिळाले. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी जिल्ह्याला एकही मंत्रीपद न मिळाल्याची खंत नेत्यांच्या मनात आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

Nanded  BJP News
Nanded Blast Case : नांदेड बाँबस्फोट प्रकरणात सीबीआयला मोठा झटका; 19 वर्षांनंतर निकाल,10 आरोपींची निर्दोष सुटका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नुकत्याच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप, उद्धवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षप्रेवश देत आघाडी घेतली. आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणत अशोक चव्हाण हे देखील कामाला लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com