Bhokar Market Committee : ठाकरेंच्या शिवसेनेला भोकरमध्ये चव्हाणांनी दाखवला बाहेरचा रस्ता..

Marathwada : काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नागनाथ घिसेवाड यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे.
Bhokar Market Committee News
Bhokar Market Committee NewsSarkarnama

Nanded : काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे फायदा-तोट्याचे गणित बघूनच ते कुठलेही राजकीय निर्णय घेत असतात. (Nanded Market Committee) नांदेड बाजार समितीत ठाकरेंच्या शिवसेनेला तीन जागा देत चव्हाणांनी महाविकास आघाडीची मोट बांधली. पण आपल्याच भोकर मतदारसंघातील बाजार समितीत एकहाती सत्ता कायम राखण्यासाठी त्यांनी इथे मात्र ठाकरे गटाला अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Bhokar Market Committee News
Mla Udyasingh Rajput News : आमदार राजपूत यांना उष्माघाताचा त्रास, प्रचारातच वाटू लागले अस्वस्थ..

त्यामुळे भोकरमध्ये आता ठाकरेंचा गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. त्यातच तेलंगणातील बीआरएस पक्षाची नांदेड मार्गे महाराष्ट्रात झालेली एन्ट्री थेट बाजार समितीत देखील पोहचली आहे. बीआरएस देखील भोकरमध्ये अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) विरोधात मैदानात उतरली आहे. (Shivsena) त्यामुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिंदे युती आणि बीआरएस अशी तिरंगी लढत भोकरमध्ये पहायला मिळेल. याशिवाय ठाकरे गट देखील इथे आपले उपद्रव मुल्य दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

१८ जागांसाठी ६२ उमेदवार रिंगणात असून तीन पॅनलमध्ये प्रमुख लढत होणार आहे. आघाडीतून शिवसेना बाहेर पडल्याने देखील येथील रंगत आणखी वाढणार आहे. (Congress) भोकर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अशोक चव्हाण सहसा इथे इतर कुणाला तोंड वर काढण्याची संधी देत नाहीत. बाजार समितीवर पुन्हा सत्तास्थापनेसाठी अशोक चव्हाण हे काही दिवस भोकरमध्येच तळ ठोकून होते.

पॅनल आणि उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता त्यांनी जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. दुसरीकडे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. चिखलीकर आणि चव्हाण यांचे राजकीय वैर जिल्ह्याला नवे नाही. भोकरमधील चव्हाणांच्या गडाला हादरा देण्याचा प्रयत्न चिखलीकर सातत्याने करत असतात, परंतु अद्याप तरी त्यांना यश मिळालेले नाही.

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नागनाथ घिसेवाड यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेश करताच बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आणि सर्व जागावर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी डावपेच सूरू आहेत. नव्याने दाखल झालेला बिआरएस पक्ष स्थानिक पातळीवर पहिल्यांदा नशिब आजमावत आहे. त्यामुळे भोकर बाजार समितीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com