Jalna Maratha Protest : मोठी बातमी! सरकार अन् आंदोलकांमधील बैठक निष्फळ ; मंत्री महाजनांची विनंती उपोषणकर्त्यांनी धुडकावली

Girish Mahajan - Manoj Jarange Meeting : '' आपल्याला जर कायमस्वरुपी न्याय द्यायचा असेल तर दोन दिवसांचा आग्रह न धरता..''
Girish Mahajan - Manoj Jarange
Girish Mahajan - Manoj Jarange Sarkarnama

Jalna Protest News: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे. तसेच शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यासह खासदार उदयनराजे, माजी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत सरकारवर आगपाखड केली होती. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली. मात्र, याचवेळी सरकारच्या संकटकाळात नेहमी धावून येणारे म्हणून 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन भाजप नेते आणि उपोषणकर्त्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.

मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) , आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण या नेत्यांनी सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या मनोज जरांगे यांनी यांची आंदोलनस्थळी जाऊन रविवारी भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा करताना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली. पण ही मागणी धुडाकावून लावत जरांगे हे अध्यादेश निघत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले. यामुळे सरकार आणि उपोषणकर्त्यांमधील बैठक निष्फळ ठरली आहे.

Girish Mahajan - Manoj Jarange
Girish Mahajan News : जालन्यातील लाठीचार्जमुळे अडचणीत आलेल्या सरकारच्या मदतीला धावले पुन्हा 'संकटमोचक' गिरीश महाजन !

महाजन म्हणाले, आपल्याला जर कायमस्वरुपी न्याय द्यायचा असेल तर दोन दिवसांचा आग्रह न धरता एक महिन्यांचा अवधी द्यावा अशी विनंती गिरीश महाजनांनी केली. एका महिन्यात सरकार निर्णय घेईल असेही ते म्हणाले. समजा आपण बळजबरीने आरक्षणासंदर्भातला अध्यादेश काढला तरी तो कोर्टात टिकणार नाही असेही ते म्हणाले.

मागच्यावेळी काय अवस्था झाली हे आपण पाहिलं. आपण दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयापर्यंत टिकलं. नंतर सरकार बदललं. आणि सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण फेटाळण्यात आले. तिथे ते व्यवस्थित मांडण्यात आले. निकाल आपल्या बाजूने लागेल. पण हे दोन दिवसांत होणार नाही. आपण थोडा वेळ द्या आपला हक्क आपण त्यांच्याकडून नक्की मागून घेऊ असेही महाजन यावेळी म्हणाले.

Girish Mahajan - Manoj Jarange
Jalna Maratha Protest : जालन्यात उद्यापासून १७ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी !

संपूर्ण मराठा समाजाला कुणबी समजून ओबीसीमध्ये समाविष्ट करुन, किंवा ओबीसी समाजाचा दाखला देऊन मराठा समाजाला आरक्षण द्या, असे मनोज जरांगे(Manoj Jarange) यांचं म्हणणं आहे. पण तसं करणं शक्य नाही. सरसकट कुणबी समजून मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा तर तीच लढाई आपली न्यायालयात सुरु आहे. तीच मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

वेगळ्या पध्दतीने जाऊन, पूर्वी आपला समाज हा कुणबी म्हणून समजला जात होता आता त्याचे पुरावेही आपल्याला शोधावे लागतील. त्यात कलेक्टर आम्हांला बोलले की, बारा गावे असे आहेत की, तिथे कुणबी म्हणून उल्लेख आहे.त्याचे कागदपत्रो पुरावी आपल्याला शोधावे लागतील.किंवा आणखी दुसरा काही पर्याय मिळतो का ते पाहावे लागेल. म्हणून थोडा वेळ द्यावा लागेल असेही महाजन म्हणाले. (Jalna Maratha Protest)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com