Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीत भाजप तर आघाडीत उद्धवसेना ठरला मराठवाड्यात मोठा भाऊ!

BJP and Uddhav Thackeray became the Big Brother in Marathwada : भाजपाचा मराठवाड्यात एकही खासदार निवडून न आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. भाजपला अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसला आहे.
Marathwada Mahayuti-Mahavikas Aghadi News
Marathwada Mahayuti-Mahavikas Aghadi Newssarkarnama
Published on
Updated on

Marathwada Assembly Election News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर काल अर्जांची छान झाली. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांना तूर्तास बंडखोरीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत चार नोव्हेंबर असल्यामुळे त्या दिवशी कोण माघार घेणार आणि कोण आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवणार? यावर कोणत्या पक्षात किती बंडखोरी झाली हे स्पष्ट होईल.

दरम्यान बंडखोरांना माघार घ्यायला लावण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी मनधरणी सुरू केली आहे. (Marathwada) मराठवाड्यातील 46 मतदारसंघांचा विचार केला तर महायुतीत भाजपने सर्वाधिक वीस ठिकाणी उमेदवार देत आपणच मोठे भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युती करत 24 जागा लढवल्या होत्या. त्या तुलनेत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महायुतीतील एन्ट्री ने भाजपला चार जागांवर पाणी सोडावे लागले.

सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 16 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने नऊ जागा मराठवाड्यात घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला. आठ पैकी केवळ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळाले. तर उर्वरित सात मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाली होती.

Marathwada Mahayuti-Mahavikas Aghadi News
Marathwada Assembly Election 2024 : मराठवाड्यात दानवे, मुंडे, देशमुख, सत्तारांचा कस लागणार..

भाजपाचा मराठवाड्यात एकही खासदार निवडून न आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. भाजपला अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसला आहे. (Mahayuti) मात्र अर्ज माघार घेण्याच्या मुदतीपर्यंत या बंडोबांना थडोबा करण्यात राज्यातील वरिष्ठ नेते यशस्वी होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 46 पैकी 17 जागा लढवत आघाडीमध्ये मोठा ठरला आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाने प्रत्येकी 15 जागा घेतल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षात काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्यात आली आहे. यात महायुतीने गंगाखेड ची जागा रासपला दिली आहे. तिथे त्याच पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार होते. 2019 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजपने 24 जागा लढवल्या होत्या.

Marathwada Mahayuti-Mahavikas Aghadi News
Mahayuti in Marathwada: अब्दुल सत्तार- रावसाहेब दानवे संघर्षामुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत!

त्यापैकी या पक्षाचे 16 आमदार निवडून आले, शिवसेनेने 22 पैकी 12 काँग्रेस, 21 पैकी आठ, राष्ट्रवादी 22 पैकी आठ तर रासप आणि शेकाप या पक्षाने प्रत्येकी एक एक जागा लढवत त्या जिंकल्या होत्या. एमआयएम ने गेल्या निवडणुकीत मराठवाड्यात दहा जागा लढवल्या, मात्र त्यांना एकाही जागेवर यश मिळाले नाही. अशीच परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची झाली होती. 44 मतदार संघात वंचित उमेदवार दिले मात्र त्यांना एकाही ठिकाणी यश मिळवता आले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com