Manoj Jarange Patil : पंकजा मुंडेना उमेदवारी, जरांगे पाटील म्हणाले, 'स्वागत करणारा मी कोण ?'

BJP announced Legislative Council candidates : विधानपरिषदेसाठी संधी मिळावी, यासाठी अनेक नेते पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी करत होते. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर जातीय समतोल साधण्यासाठी भाजपने ही उमेदवारी जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Pankaja Munde, Manoj Jarange Patil Sarkarnama

Jalna News : पुढील महिन्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या जागांसाठी भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी संधी द्यावी, अशी आग्रही मागणी आम्ही पक्ष नेतृत्वाकडे केली होती ती मान्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मुंडे यांना मिळालेल्या उमेदवारीवर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मिळालेल्या उमेदवारीच्या निर्णयाचं स्वागत करणारा मी कोण आहे ? मी स्वागत केले अन्यथा नाही केले तर पंकजा मुंडे आणि भाजपाला काही फरक पडणार आहे का? असे मनोज जरांगे म्हणाले. मुंडे यांना मिळालेल्या उमेदवारीवर आम्ही काही नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही. कारण आम्ही जातीयवादी नाही. त्यांना निवडणुकीत पाडा असे देखील आम्ही कधी म्हणालो नव्हतो. त्यांच्या उमेदवारीमुळे आमच्या समाजावर काही परिणाम होण्याचे कारणच नाही. आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत.एकजुटीने आम्ही मराठा आरक्षणासाठी लढा देणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळविणार आहोत, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Video Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांनी वाढवलं महायुतीचं 'टेन्शन'; काय दिला इशारा?

पंकजा मुंडे यांना भाजपच्या वतीने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. यावर विविध राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यातील अनेक जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकींना सामोरे जाताना जातीय समीकरणे संभाळत भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाराज समाजाला खुश करण्यासाठी हा अट्टहास केला जात असल्याचे बोलले जात आहे.

Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Vidhan Parishad Election : फडणवीसांनी सोशल इंजिनिअरिंगला दिला प्रादेशिक समतोलाचा टच!

मराठा (Maratha) आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना मुंडे यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयाचं तुम्ही स्वागत करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्याला उत्तर देताना जरांगे म्हणाले की,या निर्णयाचं स्वागत करणारा मी कोण ? त्यांना काही फरक पडणार असेल तर मी कौतुक करेन.या निर्णयाला चुकीचा निर्णय म्हणण्याचं कारण नाही आणि चांगला म्हणण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे आम्हाला दुःख होण्याचे काही कारण नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com