Video Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांनी वाढवलं महायुतीचं 'टेन्शन'; काय दिला इशारा?

Manoj Jarange Patil On Annasaheb Patil And Vinayak Mete : अण्णासाहेब पाटील, विनायक मेटे यांच्यासह मराठा तरूणांचे बलिदान आम्ही केव्हाच विसरणार नाही, असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.
Manoj Jarange Patil, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

आम्ही मराठे केव्हाच जातीवाद करत नाहीत आणि करणारही नाहीत. पण, आम्ही आता मागे हटणार नाही. जे व्हायचं ते होऊद्या. आम्ही त्याला घाबरत नाहीत. सरकारनं येणाऱ्या 13 जुलैपर्यंत मराठ्यांना न्याय नाही दिला, तर ठीक. अन्यथा 288 जणांची नावे घेऊन पाडायचे की निवडून आणायचे हे ठरवू, असा इशारा मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी महायुतीला दिला आहे.

बीड येथे शिवसंग्रामचे संस्थापक स्व. विनायक मेटे ( Vinayak Mete ) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनोज जरांगे-पाटील बोलत होते.

मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "अण्णासाहेब पाटील यांचे विचार घेऊन विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाची चळवळ चालवली. आम्ही मराठे केव्हाच जातीवाद करत नाहीत आणि करणारही नाहीत. पण, आम्ही आता मागे हटणार नाही. जे व्हायचं ते होऊद्या. आम्ही त्याला घाबरत नाहीत. सरकारनं येणाऱ्या 13 जुलैपर्यंत मराठ्यांना न्याय नाही दिला, तर ठीक. अन्यथा 288 जणांची नावे घेऊन पाडायचे की निवडून आणायचे हे ठरवू."

Manoj Jarange Patil, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Manoj Jarange: भुजबळच हे सर्व घडवत आहेत; जरांगेंचा आरोप; धनगर, ओबीसी विरोधक नाहीत...

"अण्णासाहेब पाटील, विनायक मेटे यांच्यासह मराठा तरूणांचे बलिदान आम्ही केव्हाच विसरणार नाही. एकाही मराठ्यानं मागे हटायचं नाही. आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्यांना आमच्या वेदना समजणार नाहीत. आरक्षण नसल्यानं आमच्या लेकरांची नोकऱ्यांमध्ये बढती होत नाही," अशी खंत जरांगे-पाटलांनी व्यक्त केली.

Manoj Jarange Patil, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या रॅलीला परवानगी देऊ नका; ओबीसी नेत्यांची पोलिसांकडे धाव

"तुम्ही टोळके गोळा करा, आम्ही घाबरत नाहीत. जे व्हायचे ते होईल. मराठ्यांनी मनावर घेतले, तर महाराष्ट्रात काहीही होऊ शकते. आम्ही 50 ते 55 टक्के आहोत. आम्हाला महाराष्ट्रात शांतता पाहिजे. मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. त्यामुळे शासनानं तातडीनं आमच्या मागण्यांची दखल घेऊन उपाययोजना केल्या करावी. सगेसोयऱ्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी," अशी मागणी जरांगे-पाटलांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com