फडणवीसांच्या भेटीनंतर दोन तासात साबणेंना अधिकृत उमेदवारी

सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

देगलूर : देगलूर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, देगलूरमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. साबणे यांच्या अधिकृत उमेदवारीची भाजपने घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच सुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Devendra Fadnavis
ममता बॅनर्जी फक्त 3680 मतांनी पुढे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे आले होते. त्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी साबणे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर साबणे यांना दोन तासात भाजपची अधिकृत उमेदवारी जाहिर झाली आहे.

फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजमध्ये प्रवेश करणार असल्याचे साबणे यांनी जाहीर केले होते. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या एकाधिकार शाहीला मी कंटाळलो आहे. शिवसेना संपविण्याचे काम चव्हाण नांदेडमध्ये करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहे. ते चांगली व्यक्ती आहेत. मात्र, चव्हाण यांना कंटाळून मी भाजपमध्ये जात, असल्याचे साबणे यांनी सांगितले होते.

Devendra Fadnavis
सुहास कांदे यांच्यावर शंभर गुन्हे, ते आमदार कसे?

सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. मात्र, ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. राज्यात महाविकास आघडी सरकार असताना शिवसेना नेते भाजपमध्ये जाऊन काँग्रेस विरोधात निवडणूक लढवणार, हा आघाडीसाठी मोठा धक्का आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com