Phulambri Assembly Constituency : `लाडकी बहीण योजना` सुरुच राहणार, सर्वांगीण विकासासाठी बळ द्या

Anuradha Chavan says, the overall development of the constituency will be done through the efforts of all : राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात विकासाची असंख्य कामे मार्गी लावली. ज्यातून राज्याचा दिवसागणिक विकास घडून येत आहे. राज्याच्या प्रगतीचा हा प्रवाह अखंड ठेवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.
Phulambri Assembly Constituency
Phulambri Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : महायुती सरकारने `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` योजना सुरू केली आहे. आतापर्यंत योजनेमार्फत माता-भगिनींना 7500 रुपये मिळाले आहेत, ही योजना पुढेही अखंडित सुरूच राहणार आहे, असा विश्वास फुलंब्री मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी मतदारांना दिला. फुलंब्री मतदारसंघ आणि राज्याच्या सर्वांगीण विकाससाठी बळ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

मतदारसंघातील विविध गावात अनुराधा चव्हाण नागरीकांशी संवाद साधत आहेत. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, वयोवृद्ध अशा सगळ्याच वर्गासाठी राज्यातील महायुतीचे सरकार काम करत आहे. (BJP) विकासाचा हा ओघ राज्यात कायम राखण्यासाठी पुन्हा तुमचा भक्कम पाठिंबा आवश्यक आहे. म्हणूनच येत्या निवडणुकीत मतदारसंघाच्या व राज्याच्या सर्वांगीण विकाससाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन अनुराधा चव्हाण यांनी केले.

राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात विकासाची असंख्य कामे मार्गी लावली. ज्यातून राज्याचा दिवसागणिक विकास घडून येत आहे. राज्याच्या प्रगतीचा हा प्रवाह अखंड ठेवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. महायुती सरकारने विकासाच्या असंख्य कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, सर्वसामान्य अशा प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

Phulambri Assembly Constituency
Maharashtra BJP: भाजपची मोठी कारवाई 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

फुलंब्री मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करायचे आहेत, असेही चव्हाण म्हणाल्या. 2014 ते 2019 या काळामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. (Raosaheb Danve) 2024 पर्यंत या देशामध्ये आणि राज्यांमध्ये महायुतीचे सरकार आले. उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत असल्यामुळे मतदान मिळाले मात्र त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली.

या अडीच वर्षाच्या काळात लोकांची कामे झाली नाही. त्यामुळे पुन्हा भाजप- महायुती सत्तेत आल्यानंतर अनेक रखडलेली कामे मार्गी लावण्याचे काम या सरकारने केले. भविष्यात देखील अशीच विकास कामे व्हावी यासाठी महायुतीलाच मतदान करा, आणि मतदार संघाच्या विकासासाठी अनुराधा चव्हाण यांना संधी द्या, असे आवाहन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पाल येथील प्रचार सभेत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com