Maharashtra BJP: भाजपची मोठी कारवाई 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

BJP Action Against Rebels in Assembly Election: भाजपने बंडखोर पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश न पाळणाऱ्या जवळपास चाळीस बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा देखील समावेश आहे.
Maharashtra BJP
Maharashtra BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 06 Nov : भाजपने बंडखोर पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश न पाळणाऱ्या जवळपास चाळीस बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा देखील समावेश आहे.

त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात भाजप महायुतीतील मित्र पक्षांसह विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदेच्या शिवसेनेशी वाद आहेत.

तसंच अनेक इच्छुकांना मित्र पक्षांमुळे आपल्या उमेदवारीवर पाणी सोडावं लागलं आहे. त्यामुळे काहींनी उघड नाराजी बोलून दाखवली तर काहींनी थेट बंडखोरी केली. मात्र, ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले होते.

Maharashtra BJP
Devendra Fadnavis News : 'मविआ'च्या 'त्या' नेत्यांपासूनच महिलांना सुरक्षा द्यावी लागणार ? फडणवीसांनी 'तो' मुद्दा पुन्हा पेटवलाच

त्याच पार्श्वभूमीवर आता जवळपास चाळीस बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून याबाबतचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Maharashtra BJP
Mahayuti And MNS : 'माहिम'मध्ये जमलं नाही, पण भाजपनं ते 'शिवडी'त घडवून आणलं, मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर

यामध्ये लिहिलं आहे की, 'आपण भारतीय जनता पार्टीचे (BJP) पदाधिकारी असून पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे.' यामध्ये विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हकालपट्टी केलेले पदाधिकारी -

श्रीकांत करलै

सोपान पाटील

मयुर कापसे

आश्विन सोनवणे

गजानन महाले

नागेश घोये

तुषार भारतीय

जगदीश गुप्ता

प्रमोद सिंह गडरेल

सोमदत करंजेकर

शंकर महावी

बिजभूषण पाझारे

वसंत वरजुरकर

राजू गायकवाड़

अतेशाम अली

भाविक भगत

नटवरलाल उतवम

वैशाली मिलिंद देशमुख

मिलिंद उत्तमराव देशमुख

दिलीप वैकटराव कंदकुर्त

सुनील साहेबराव मोरे

संजय घोगरे

सतीश जगनायराव घाटगे

अशोक पांगारकर

सुरेश सोनवणे

एकनाथ जाधव

कुणाल शिवाजी सुर्यवंशी

आकाश साळुंखे

जयश्री गरुड

हरिष भगत

स्नेहा देवेंद्र पाटील

वरुण सदाशिव पाटील

गोपाळ जव्हेरी

धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर

दिलीप विठ्ठल भोईर

बाळासाहेब मुरकुटे

शोभा बनशेट्टी

सुनिल बंडगर

सुवर्णा पाचपुते

विशाल प्रभाकर परब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com