Amit Shah
Amit ShahSarkarnama

Amit Shah News: भाजपने रणशिंग फुंकलं; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा संकल्प, शाहांची मोठी घोषणा

BJP News : नांदेडमध्ये भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केलं.
Published on

Maharashtra : केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध कार्यक्रमांच आयोजन केलं आहे. राज्यात देखील 30 जूनपर्यंत भाजपकडून विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकत महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याच्या संकल्पाची घोषणा केली.

यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे, अशी मोठी घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला विकासात पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले, असं ते म्हणाले.

Amit Shah
Amit Shah on Thackeray: अमित शाह उद्धव ठाकरेंवर पुन्हा बरसले; 'या' मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आव्हान

अमित शाह म्हणाले, "केंद्रात भाजपच्या सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या नऊ वर्षाच मोदी सरकारने पारदर्शक कारभार केला. मात्र, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारने मोठा भ्रष्ट्राचार केला. युपीए सरकारच्या काळात तब्बल 12 लाख कोटींचे घोटाळे झाले आहेत. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये शरद पवार हे देखील होते. हे सरकार सर्वात भ्रष्ट सरकार होतं. पण गेल्या नऊ वर्षात हे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु शकले नाहीत", असं शाह म्हणाले.

Amit Shah
Amit Saha Nanded Rally : शिंदेकडे दुर्लक्ष, फडणवीसांचे कौतुक अन् ठाकरेंवर राग काढत शहांनी फोडला प्रचाराचा नारळ..

"देशात आधी बॉम्बस्फोट व्हायचे. तेव्हा मनमोहन सिंह यांच्या मुखातून काही निघायचे नाही. मात्र, मोदींनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला घरात घुसून धडा शिकवला. एवढंच नाही तर नरेंद्र मोदी सरकारच्या काळात गरीब कल्याणाची अनेक कामं झाली असून मोदींनी दहशतवाद संपवला. राहुल गांधी आणि शरद पवार यांनी 370 कलम हटवण्याला विरोध केला. मात्र, मोदी सरकारने 370 कलम हटवून दाखवलं", असं शाह म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com