BJP News : काल रडारड, राडा, आत्मदहनाचा प्रयत्न....अन् आज छावणीचं स्वरुप आलेल्या भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश

Sambhajinagar BJP Office Clash : छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्याने भाजप कार्यालयात राडा, आंदोलन आणि पोलिस बंदोबस्त पाहायला मिळाला; मात्र दुसऱ्याच दिवशी नेत्यांनी नाराजी दूर करत पक्षप्रवेश घडवून आणले.
Senior BJP leaders oversee party inductions at the Chhatrapati Sambhajinagar office a day after protests, clashes, and police deployment following ticket distribution unrest.
Senior BJP leaders oversee party inductions at the Chhatrapati Sambhajinagar office a day after protests, clashes, and police deployment following ticket distribution unrest.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News : भाजपातील अनेक इच्छुकांची तिकीटे कापली गेल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रचार कार्यालयात सलग दोन दिवस राडा झाल्याचे पहायला मिळाले. पहिल्या दिवशी उमेदवारी नाकारलेल्या महिला व पुरूष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री, खासदार, आमदारांना धारेवर धरले होते आणि उपोषण सुरू केले होते. तर कालही एका इच्छुकांने पत्नी, कुटुंब आणि प्रभागातील समर्थकांना आणत मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्या गाडीवर आदळआपट केली. अक्षरशः शिव्या घालत या दोन्ही नेत्यांना तिथून पळवून लावले.

राज्यभरात शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या प्रचार कार्यालयात बेशिस्तीचे आणि कार्यकर्त्यांच्या उद्रेकाचे चित्र पोहचले. या राड्यानंतर प्रचार कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कार्यकर्ते कमी आणि पोलीसांची संख्या अधिक होती. दुसरीकडे उपोषणकर्त्या महिलाही ठाम होत्या. त्याच भाजपच्या प्रचार कार्यालयातील वातावरण आता निवळले आहे. नाराजांची समजूत काढण्यात नेत्यांना यश आले आहे. उपोषणाला बसलेल्या दिव्या मराठे व इतर महिला कार्यकर्त्यांनी आमचे समाधान झाले म्हणत आंदोलन गुंडाळले.

काल ज्या मंत्री, खासदारांना प्रचार कार्यालयाच्या दारावरूनच माघारी फिरावे लागले, त्यांनी आज चक्क काही पक्षप्रवेशही घडवून आणले. ॲड.दीपक क्षिरसागर, करण मिसाळ, अनिल मुळे,अनूराधा मुळे यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. शहरजिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केणेकर यांच्या उपस्थितीत या सगळ्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावरून पक्षातील नाराजी नाट्य तुर्तास तरी संपल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.

संजय केणेकर भाव खाऊन गेले..

भाजप कार्यालयात दोन दिवस झालेल्या राड्यानंतर काल एक ते दीड तास उमेदवारी कापलेल्या इच्छुाकांनी नेत्यांना सळो की पळो करून सोडले होते. कराड, सावे यांना इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांचा रुद्रावतार पाहून गाडीच्या खाली उतरणेही शक्य झाले नाही. त्यांना आल्या पावली परतावे लागले होते. जवळपास सगळ्याच माध्यमांनी तासभर भाजप कार्यालयातील हा राडा राज्यभर पोहचवला. त्यानंतर आमदार संजय केनेकर यांनी प्रचार कार्यालयात येण्याचे आणि संतापलेल्या इच्छुक व त्यांच्या समर्थकांची समजूत काढण्याचे धाडस दाखवले.

Senior BJP leaders oversee party inductions at the Chhatrapati Sambhajinagar office a day after protests, clashes, and police deployment following ticket distribution unrest.
BJP Shivsena alliance : 9 बैठकांनंतरही भाजप नेत्यांचा रिप्लायच नाही, म्हणून युती तुटली : अतुल सावे, संजय केनेकरांच्या वागण्यावर शिरसाट फाडफाड बोलले...

कार्यकर्ते इतकी संतप्त झाले होते की ते काहीही करू शकतील अशी परिस्थिती होती. शेकडोंच्या गर्दीतून केनेकर यांनी माध्यमांनाही तोंड दिले आणि नाराज प्रशात पाटील भदाने यांना आधी पक्ष कार्यालयातील व्हिआयपी रुममध्ये आणि तिथून आपल्या गाडीतून दुसऱ्या ठिकाणी नेले. केणेकर यांच्या या हुशारीमुळे भाजप कार्यालयातील राडा आणि त्याचे थेट प्रक्षेपणही थांबले.

Senior BJP leaders oversee party inductions at the Chhatrapati Sambhajinagar office a day after protests, clashes, and police deployment following ticket distribution unrest.
Shivsena Vs BJP : CM फडणवीसांचेही ऐकले नाही... भाजपनेच युती तोडली! आता भोगा, संजय शिरसाट यांनी सुनावले!

त्यानंतर संपूर्ण प्रचार कार्यालयाचा ताबाच पोलीसांनी घेतला होता. केणेकर यांनी आपल्याला कार्यकर्त्यांची नस कळते, असा संदेशही आपल्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. जे मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, शहरजिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, आमदार अनुराधा चव्हाण यांना जमले नाही ते संजय केनेकर यांनी करून दाखवल्याची चर्चा जिल्हाभरात होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com