महाआरती करायला निघालेल्या भाजप शहर-जिल्हाध्यक्षाला अटक

केनेकर हे सकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भडकल गेट परिसरात जाणार होते. तिथून शौर्यदिनानिमित्त महाआरती करण्यासाठी ते जाणार होते. (Bjp City President)
Bjp Sanjay Kenekar
Bjp Sanjay KenekarSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः आयोध्येतील (Ayodhya) वादग्रस्त वास्तू पाडल्याचा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करणाऱ्या व महाआरतीसाठी मंदिरात जाणाऱ्या भाजपच्या (Bjp) शहर-जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी अटक केली. औरंगाबादेत ६ डिसेंबर हा शौर्यदिन म्हणून हिंदुत्ववादी संघटना शिवसेना, भाजप साजरा करत असतात. या निमित्ताने शहरातील विविध मंदिरांमध्ये महाआरती केली जाते. परंतु सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस (Mahavikas Aghadi) या तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेने यंदा महाआरतीचा कार्यक्रम गुंडाळला.

याचा राजकीय फायदा उचलण्याच्या उद्देशाने भाजपने आज शहरातील सुपारी हनुमाम मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. आरतीसाठी जाण्यापुर्वीच पोलिसांनी भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांना अटक केली. केनेकर हे सकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भडकल गेट परिसरात जाणार होते. तिथून शौर्यदिनानिमित्त महाआरती करण्यासाठी ते जाणार होते.

तत्पुर्वीच भाजप विभागीय कार्यालयात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. तिथे उपस्थितीत शहराध्यक्ष केनेकर यांना पोलिसांनी अटक केली. वेदांतनगर पोलिस स्टेशन मध्ये त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हिंदूना घाबरते, म्हणूनच पोलिसांना पुढे करत आम्हाला रोखण्यात आले, असा आरोप केनेकर यांनी यावेळी केला.

Bjp Sanjay Kenekar
माझ्या नावाने बाेंबलून काय उपयोग, मी साधा माणूस; माझ्यावर जेवढे आरोप तेवढा मी मोठा

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने सातत्याने शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. आज सहा डिसेंबर रोजी शिवसेनेकडून कुठेही महाआरती केली जाणार नाही, हे लक्षात घेऊन भाजपने महाआरतीचे आयोजन केले होते. आगामी महापालिकेच्या निवडणुका पाहता कोणत्या पक्षाचे हिंदुत्व श्रेष्ठ हा प्रचाराचा मुद्दा असणार हे यावरून स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com