Sandipan Bhumare : भुमरे खासदार झाले, भाजपला हवंय पालकमंत्रीपद; शिरसाटांच्या आशेवर पुन्हा पाणी फिरणार?

Sanjay Shirsat News : आधीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागांवरून राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. त्यात भाजपनं पालकमंत्रीपदावर दावा केल्यानं शिरसाटांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.
sanjay shirsat | sandipan bhumare | atul save
sanjay shirsat | sandipan bhumare | atul savesarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : संदीपान भुमरे हे लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून विजयी होऊन खासदार झाले आहेत. त्यामुळे संभाजीनगरचे पालकमंत्रीपद सध्या रिक्त झाले आहे. या पदावर वर्णी लागावी यासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्नात असलेल्या पश्चिमचे आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या आशेवर पुन्हा पाणी फिरणार असे दिसते.

कारण, भाजपने पालकमंत्री पदावर दावा सांगत अतुल सावे ( Atul Save ) यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवावे अशी मागणी, पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केली आहे. मराठवाड्यातील एकमेव संभाजीनगरमधून महायुतीचा खासदार निवडून आला आहे. संदीपान भुमरे यांना 1 लाख 35 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यांनी 'एमआयएम'च्या इम्तियाज जलील, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला.

भुमरे यांच्या या यशात भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपने मनापासून भुमरे ( Sandipan Bhumare ) यांचे काम करत युती धर्म पाळला. त्यामुळे जिल्ह्याचे रिक्त असलेले पालकमंत्रीपद आता भाजपला मिळायला हवे. अतुल सावे यांच्याकडे जिल्ह्याचा पदभार सोपवावा, अशी मागणी बोराळकर यांनी केली आहे.

अतुल सावे हे संभाजीनगरचे आहेत. त्यांना मंत्रिपदाचा आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. शिवाय महायुतीची जागा निवडून आणण्यासाठी भाजपने मनापासून काम केले आणि संदीपान भुमरे यांना निवडून आणले. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्रीपद रिक्त होणार आहे. ते भाजपला मिळावे, अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे बोराळकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या दाव्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

sanjay shirsat | sandipan bhumare | atul save
Kalyan Kale : जरांगेंच्या आंदोलनाला वडेट्टीवारांनी विरोध केला असेल तर ते चुकीचे....

आधीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागांवरून राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. त्यात भाजपने संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर दावा केल्याने आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. भाजपच्या दाव्यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com